;बीटेक’ची डिग्री घेऊन बनला ‘डॉक्टर साहेब’, छापा पडल्यावर झाला ‘इलाज’

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील श्योपुरमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करत लोकांचे उपचार करणाऱ्या दोन बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश झाल्यावर लोक आश्चर्यचकित झाले. खरतर बी.टेकची पदवी घेतलेली एक व्यक्ती बनावट डॉक्टर म्हणून लोकांवर उपचार करत होती.

श्योपूर जिल्ह्यातील कराहल येथील बीएमओ लोकांकडून तक्रारी आल्यानंतर दोन बनावट डॉक्टरांच्या दवाखान्यात गेल्यावर ते आश्चर्यचकित झाले. तेथे ३०-४० रूग्णांची गर्दी होती आणि एक बनावट डॉक्टर त्यांच्यावर उपचार देखील करत होता. या लोकांना लॉकडाऊनची देखील पर्वा नव्हती.

जेव्हा बीएमओने बनावट डॉक्टरला विचारले की तुम्ही कोणत्या आजारावर उपचार करता, तर बनावट डॉक्टरने पूर्ण आत्मविश्वासाने उलट प्रश्न केला, मी प्रत्येक आजारावर उपचार करतो, तुम्हाला कोणता आजार आहे?

जेव्हा अधिकाऱ्याने त्याला कठोरपणे विचारले की तुमच्याकडे कोणती डिग्री आहे, तेव्हा बनावट डॉक्टर घाबरले आणि विनवणी करण्यास सुरुवात केली. नंतर भीत-भीत उत्तर दिले – बी.टेक.

महेश कुशवाहा असे डॉक्टरचे नाव सांगितले जात असून बीएमओ डॉ. विजेंद्र रावत यांनी बनावट डॉक्टरांविरोधात कारवाई करून त्यांचे क्लिनिक सील केले. यासह आणखी एक बनावट डॉक्टर रामदिन कढेरा यांचे क्लिनिकही बंद केले.

खरतर बनावट डॉक्टरांविरूद्ध बर्‍याच तक्रारी येत होत्या. त्या आधारे हा छापा टाकण्यात आला. दोन्ही बनावट डॉक्टरांविरोधात पोलिस तक्रारही देण्यात आली असून आजूबाजूच्या लोकांनाही या बनावट डॉक्टरांच्या जाळ्यात फसून जीव धोक्यात घालू नका असा इशारा देण्यात आला आहे.