‘या’ घरातून 8 दिवसांपासून निघतायेत ‘खतरनाक’ किंग कोबरा, आतापर्यंत 123 निघालेत

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – घराबाहेर कोरोना विषाणू आणि घरात किंग कोब्रा. मध्य प्रदेशमधील भिंड शहरातील एका गावात राहणाऱ्या एका कुटूंबाची ही परिस्थिती आहे. चचाई गावात राहणारे जीवन कुशवाह यांच्या घरात मागच्या ८ दिवसांपासून प्राणघातक किंग कोब्राची पिल्ले निघत आहेत. जीवन यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत घरात १२३ कोब्रा पकडले आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, कोब्रा चावेल या भीतीने घरातील स्त्रिया आणि मुले घराबाहेर राहण्यास मजबूर आहेत.

ही घटना भिंडच्या रौन जिल्ह्यातील चचाई गावची आहे. बिरखडी पंचायतच्या चचाई येथे राहणारे जीवन सिंह कुशवाह यांचे कुटुंब गेल्या आठ दिवसांपासून घरात साप निघत असल्यामुळे घाबरून गेले आहे. जीवन सिंहच्या घरात रोज दरवाजा जवळ आणि बाहेर सापाची पिल्ले निघत आहेत. सलग ८ दिवस असेच सुरू आहे. घरातील लोकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठ दिवसांत आतापर्यंत १२३ साप त्यांच्या घरात निघाले आहेत. कधी २१ तर कधी ५२ साप निघाले आहेत.

या सापांच्या भीतीमुळे जीवनचे कुटुंब रात्रंदिवस भयभीत आहे. जीवनचे म्हणणे आहे की, ग्रामस्थांनी साप किंग कोब्रा असल्याचे सांगितले आहे. जो प्राणघातक साप आहे. हे समजताच कुटुंबातील महिला आणि मुले घराबाहेर राहून वेळ घालवत आहेत. ते पुढे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून ते झोपले नाहीत. रात्रभर जागून लक्ष ठेवावे लागते. साप दिसताच त्यांना धरून पाण्याने भरलेल्या भांड्यात सोडतो आणि आता त्यांची संख्या वाढत चालली आहे.

जीवनचे म्हणणे आहे की, आम्ही त्यांना गावाजवळील बांबूवर सोडून देतो. हे साप रात्री आठनंतरच निघतात. अशात रात्रभर त्यांना पकडण्याचे काम चालते आणि नंतर हे साप बाहेर सोडले जातात. लॉकडाऊनमध्ये सरकार सर्वांना घरात राहण्याचे निर्देश देत आहे, पण जीवनचे कुटुंब या लॉकडाऊनमध्ये साप निघत असल्यामुळे घराबाहेर राहण्यास मजबूर आहे.

जीवन सिंहचे म्हणणे आहे की, गावातील लोकांच्या मते कोब्रा शेपूट आणि तोंड दोन्हीकडून विषारी असतो, त्यामुळे भीती अधिक आहे. आम्हाला आठ दिवस झाले त्यांना धरून ठेवत आहोत आणि बाहेर सोडतो. रात्रभर झोपत नाही, यांना पकडत बसतो. धोका लक्षात घेता मुलांना फिरू देत नाही.