डंपर खाली चिरडल्यानंतर तडपत ओरडत होती युवती, बघणारे व्हिडिओ काढण्यात ‘मग्न’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील भिंडमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका अपघातात एक युवती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडली असताना नागरिक मात्र केवळ तमाशा पाहण्यात व्यस्त होते. तिला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी लोकं व्हिडीओ काढण्यात व्यस्त होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिला त्याठिकाणी मृत घोषित करण्यात आले.

नारीपुरा गावातील रहिवासी असलेली प्रियंका जाटव ही आपल्या सायकलने घरी येत होती. त्यावेळी गतिरोधकावरून तिचा तोल गेल्याने मागून आलेल्या डंपरखाली सापडून तिचा मृत्यू झाला. यावेळी गंभीर जखमी झालेली प्रियंका रस्त्यावर पडून होती. मात्र गर्दीतील एकानेही तिला रूग्णालयात घेऊन जाण्याची हिम्मत दाखवली नाही. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात रूग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी