म्हणून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ घेणार आमदारकीची शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ १० जूनला आमदारकीची शपथ घेणार आहेत. मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सकाळी १० वाजता शपथ देतील. डिसेंबरमध्ये कमलनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी कमलनाथ यांनी विधानसभा निवडणूक लढली नव्हती. यानंतर लगोलग, लोकसभा निवडणूका झाल्या, याच दरम्यान छिंदवाडा विधानसभेसाठी निवडणूका घेण्यात आल्या, ज्यात कमलनाथ विजयी झाले. नियमानुसार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ६ महिन्यात विधानसभेचे सदस्य बनने आवश्यक असते. त्यामुळे छिंदवाडा मधून निवडणूक लढवत ते विधानसभेचे सदस्य झाले.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होण्याआधी कमलनाथ १९९१ पासून १९९४ या कालावधीत वन आणि पर्यावरण मंत्री होते, १९९५ ते १९९६ या कालावधीत ते केंद्रीय मंत्री होते, २००४ ते २००८ या काळात ते केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री होते. २००९ ते २०११ या काळात रस्ते आणि परिवहन मंत्री होते. तर २०१२ पासून २०१४ पर्यत ते शहरी विकास आणि संसदीय कार्यमंत्री होते.

देशभरात जेव्हा लोकसभा निवडणूका सुरु होत्या त्यावेळी मध्यप्रदेशातील स्थानिक नेतृत्व म्हणून कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंद्धिया यांची लोकसभा निवडणूकीसाठी पक्षाचा प्रचार करण्याची जबाबदारी होती. मात्र कमलनाथ यांचेच भवितव्य पणाला लागल्याने ते स्वत:ला जिंकून आणण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी धावपळ करत होते. लोकसभेत योग्य प्रचार झाला नसल्याने संपुर्ण मध्यप्रदेशातून काँग्रेसचा एकच खासदार जिंकून आला. त्यामुळे अपयशाचे खापर कमलनाथ यांच्यावर फोडले जात आहे.

असे असले तरी मध्यप्रदेशात विधानसभा निवडणूकीत भाजपला भुईसपाट करुन विजय मिळवण्यात त्यांची महत्वपुर्ण भूमिका होती. मध्यप्रदेशात विधानसभेला काँग्रेसने तेथील शिवराजसिंह सरकारच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंद्धिया यांनी यात महत्वाची भूमिका निभावली होती, अखेर भाजपला मध्यप्रदेशात नमवत काँग्रेसला घवघवीत यश मिळाले होते.