काय सांगता ! होय, फारूख खान नियमित 5 वेळा करतात नमाज ‘पठण’, घेतात रामायणाचा ‘क्लास’ अन् ‘ही’ त्यांची खासियत

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगडमध्ये अशी एक व्यक्ती आहे जी मुस्लिम असूनही लोकांना रामाच्या नावाने जोडते आणि रामायणावर लोकांना प्रवचन देते. फारुख खान असं या व्यक्तीचं नाव आहे. ते अशा जातीय सलोख्याचा चेहरा आहेत ज्यामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला भारत देश दिसतो. त्यांच्या खास आणि आदर्श शैलीमुळे लोक त्यांना फारुख रामायणी असे म्हणतात.

सध्या देशात रामाच्या नावावरून वादही सुरू आहे आणि राजकारणही सुरू आहे. अशात फारुख यांची कामगिरी आदर्श आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. फारुख हे राजगड जिल्ह्यातील नरसिंगगडमध्ये राहतात. गेल्या 35 वर्षांपासून ते संगीतमय रामकथा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत देशातील विविध 300 पेक्षा जास्त ठिकाणी रामकथा सांगितल्या आहेत.

फारुख खान रोज न चुकता 5 वेळा नमाज पढतात. फारुख म्हणतात, “राम माझ्या श्वासात आहे.” रामाच्या नावाखाली ते लोकांना एकत्र आणण्याचं पवित्र काम करत आहेत. यातून त्यांना काही आर्थिक मदतही होते. लोकांना एकत्र आणणं हा माझा राम आहे असं ते म्हणतात. एकाच वेळी शेकडो लोक त्यांची रामकथा ऐकतात.

फारुख यांच्या कामगिरीमुळे लहान मुलांवर चांगले संस्कार होतात अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी दिली आहे आणि त्यांच्या कामगिरीचे कौतुकही केले आहे.

Visit : Policenama.com