भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते बाबूलाल गौर यांचे आज पहाटे भोपाळमधील नर्मदा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. 89 वर्षीय बाबूलाल गौर याची प्रकृती मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. त्यांचा रक्तदाब अतिशय कमी झाला होता. त्याचबरोबर त्यांच्या किडन्यांनी काम करणे थांबवले असल्याने ते मागील 14 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते.

भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी 12:30 वाजता त्यांचे पार्थिव भाजप प्रदेश कार्यालयामध्ये अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. याठिकाणी नागरिकांना आणि सामान्य कार्यकर्त्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. बाबूलाल गौर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी म्हटले कि, हे सांगताना मला खूप दुःख होत होत आहे कि, आमचे मार्गदर्शक आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल जी गौर आता आपल्यात नसून त्यांचे दुःखद निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 7 ऑगस्ट रोजी त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात बिघडल्याने त्यांना भोपाळमधील एका खासगी दवाखाण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 89 वर्षीय गौर यांना फुफ्फुस मध्ये इन्फेक्शन झाले होते. त्यानंतर अनेक राजकीय नेते त्यांच्या भेटीसाठी दवाखाण्यात गेले होते. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी देखील त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली होती.

दरम्यान, बाबूलाल गौर 23 ऑगस्ट 2004 ते 29 नोव्हेंबर 2005 या काळात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील प्रतापगढ मध्ये दोन जून 1930 रोजी झाला होता. 1946 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर जोडले गेले होते.

आरोग्यविषयक वृत्त –