पहिलं गळा दाबला आणि नंतर धावत्या कार मधून दिलं फेकून, झाला प्रकरणाचा ‘पर्दाफाश’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. 23 तारखेला रस्त्यावर सापडलेल्या महिलेच्या मृतदेहप्रकरणी पोलीस तपास करत होते. त्यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ एक पर्स आढळून आली होती. त्यामध्ये सापडलेल्या आधारकार्डनुसार महिलेची ओळख पटली होती. या मृत महिलेचे नाव निधि ठाकुर असे होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असता पोलिसांना माहिती मिळाली कि, महिला दीड वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त आपल्या दोन मुलींसह राहत होती. तसेच घटनेच्या एक दिवस आधी ती आपला मित्र अजय यादव याच्यासह छिंदवाडाला गेली होती.

आरोपीने गुन्हा मान्य केला –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गळा दाबून या महिलेची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अजय यादवचा तपास सुरु केला होता. त्यानंतर मिसरोदमधून अजय यादवला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याने निधीची हत्या केल्याची कबुली दिली.

पैश्याच्या मागणीवरून हत्या –

अजय याने दिलेल्या माहितीनुसार, तो एका फॅक्ट्रीमध्ये ठेकेदार असून तेथे काम करताना त्याची ओळख निधी हिच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्याने तिला एक घरीदेखील घेऊन दिले होते. त्याचबरोबर महिन्याला 10 हजार रुपये देखील देत असे. त्याचबरोबर वेळोवेळी तिच्या मागणीनुसार देखील पैसे देत असे.

ओढणीने गळा आवळून हत्या –

जय याने सांगितले कि, आपल्या दोन्ही मुलींच्या नावावर एक एक लाख रुपयाची एफडी करण्याची मागणी निधीने केली होती. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी भोपाळला येत असताना त्याने रात्री तीन वाजता आपल्या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानंतर अन्सारी याला त्याने आपला प्रॉब्लेम सांगितला असता त्याने चालत्या गाडीतच निधीचा गळा आवळून हत्या केली आणि मृतदेह बाहेर फेकून दिला.
त्यानंतर पोलिसांनी अजय यादवचा मित्र अन्सारी याला देखील ताब्यात घेतले असून हत्येआधी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत कि नाही याचा पोलीस तपास करत आहेत.

Visit : Policenama.com