महिला कलेक्टरबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपाचा नेता ‘गोत्यात’, झाली अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील राजगढच्या कलेक्टर निधि निवेदिता यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. बद्रीलाला यादव असे या नेत्याचे नाव आहे. कलेक्टर विरोधात असभ्य भाषेचा वापर केल्यामुळे शुक्रवारी ही अटक करण्यात आली.

राजगड जिल्ह्यातील ब्यावरा येथे झालेल्या सभेला संबोधित करताना बद्रीलाल यादव यांनी राजगड जिल्हाधिकाऱ्यावर एक आक्षेपार्ह विधान केले होते. ते म्हणाले, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका परंतु माझ्या मनात एक गोष्ट आली, म्हणूनच मी बोलत आहे. कलेक्टर काँग्रेस वाल्यांना मांडीवर घेऊन दूध पाजतात आणि भाजप वाल्यांना चपराक लगावते. विशेष म्हणजे या सभेसाठी कैलाश विजयवर्गीय, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राकेश सिंह आणि गोपाल भार्गव समवेत इतर भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कानाखाली मरणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही
भाजप नेत्याच्या अटकेनंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हंटले की,बद्रीलाला यादव यांच्यावर पूर्ण कारवाई केली परंतु कानाखाली मरणाऱ्यांवर कोणतीच कारवाई नाही ? आई, मुलगी आणि बहिणींचा आम्ही सन्मान करतो परंतु कायदा हा केवळ सर्वसामान्यांसाठीच आहे का ? कायदा पदांवर बसलेल्यांसाठी नाही का ? कारवाई सगळ्यांवर का नाही ? असा सवाल यावेळी चौहान यांनी उपस्थित केला.

शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, काँग्रेस सरकार मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी कारवाई करते. बद्रीलाला यांनी याबाबत दुःख व्यक्त केले आहे ते म्हणाले की, माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता, आम्ही महिलांचा सन्मान करतो परंतु कोणत्याही अधिकाऱ्याला कानाखाली मारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.

फेसबुक पेज लाईक करा –