‘दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला आहे’ : भाजपा नेत्याची वादग्रस्त टीका 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नाही” असं बेताल वक्तव्य भाजपा नेत्याने केले आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटले होते. यावरून त्यांच्यावर टीका करताना भाजाप नेत्याची जीभ घसरली आहे. गोपाल भार्गव असं या भाजपा नेत्याचं नाव आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते . त्यात त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटले होते. त्यांच्या या ट्विटनंतर वाद उफाळून आला होता. त्यांच्या या ट्विटचा दाखला देत मध्य प्रदेशातील भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली. परंतु दिग्विजय सिंह यांच्यावर आपली तोफ डागताना त्यांनी खालच्या थराला जात बेताल वक्तव्य केले आहे. “दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून जोवर ते मोबाईलवर बोटं चालवत नाही
आणि तोंडातून भारताविरोधात विधान करत नाही, तोवर त्यांना जेवणच जात नाही” असे म्हणत भार्गव यांनी वादग्रस्त टीका केली आहे.

https://twitter.com/ANI/status/1103827102380580864
यापूर्वी केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांनीही दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली होती. यावेळी व्ही के सिंह यांनी राजीव गांधी यांची हत्या दुर्घटना होती की दहशतवादी कारवाई ? असे म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केला होता. प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसवर आपली तोफ डागत म्हटले होते की, “काँग्रेसला काय झालंय , ते जनभावनेविरोधात बोलत आहेत, सैन्याच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहे.”
काय म्हणाले होते दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट केले होते. मोदींना लक्ष्य करत त्यांनी म्हटले होते की, “पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी प्रसारमाध्यमे शंका घेत आहेत. ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे” असे त्यांनी म्हटले होते. दिग्विजय सिंह यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना म्हटले होते.
https://twitter.com/digvijaya_28/status/1102726517669261314