‘मी जोरू चा गुलाम बनून राहिल’ ! साखरपुडा वाचवण्यासाठी मुलानं चक्क 108 वेळा लिहून दिलं

भोपाळ : साखरपुड्यानंतर नियोजित वराच्या बोलण्यामुळे नाराज मुलीने लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणाला मजेशीर वळण तेव्हा मिळाले, जेव्हा मुलाने 108 वेळा मी जोरू का गुलाम होईन, असे लिहून दिले. यानंतर मुलगी लग्नासाठी तयार झाली. तत्पर्वी, हे प्रकरण मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या एका फॅमिली कोर्टात गेले होते, तेथे दोघांचे समुपदेशन केल्यानंतर मुलगी लग्नाला तयार झाली.

वागदत्त वधूने होणार्‍या पतीला गंमतीने पाठवला व्हिडिओ

फॅमिली कोर्टाच्या कॉन्सिलर सरिता राजानी यांनी सोमवारी सांगितले की, मुंबईत नोकरी करणार्‍या भोपाळच्या एका मुलाचा आणि मुलीचा भोपाळमध्ये साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर वागदत्त पत्नीने आपल्या होणार्‍या पतीला गमतीने एक व्हिडिओ पाठवला. व्हिडिओमध्ये लॉकडाऊनमध्ये पती भांडी धुताना दिसत होता आणि पत्नीच्या इशार्‍यावर नाचताना दिसत होता. व्हिडिओसोबत वागदत्त वधूने लिहिले की, लग्नानंतर तुझ्यावरही हे लागू होईल. राजानी यांनी सांगितले की, हा व्हिडिओ पाहून मुलाने उत्तर दिले की, मी या श्रेणीत नाही. अशा लोकांची वेगळी श्रेणी असते.

कौन्सिलिंगनंतर लग्नाला तयार झाली मुलगी

सरिता राजानी यांनी सांगितले की, मलाचे उत्तर ऐकुन मुलीला राग आला आणि पहिल्याच दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर मुलीने 2 मे 2020 रोजी साखरपुडा तोडला. दोघांचा विवाह 20 मेरोजी होणार होता. राजानी म्हणाल्या, कुटुंबातील लोक या घटनेने अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुलीला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु, ती ऐकण्यास तयार नव्हती. यानंतर मुलाचे कुटुंबिय फॅमिली कोर्टात पोहचले. तेथे चार दिवसापर्यंत मुलगा आणि मुलगी दोघांचे कौन्सिलिंग करण्यात आले आणि मुलगी त्याच मुलाशी लग्न करण्यास तयार झाली.

खासगी कंपनीत एक्झीक्युटीव्ह पदावर काम करतात दोघे

राजानी यांनी सांगितले की, आम्हाला दोघांना समजावण्यास चार दिवस लागले. मुलगा म्हणाला की, छोट्याशा गोष्टीवरून त्याची नियोजित वधू इतके वाईट वाटून घेईल, हे त्याला माहित नव्हते. मुलाने सर्वांच्या समोर तिची माफी मागितली. शिवाय 108 वेळा लिहून दिले की, मी बायकोचा गुलाम होईन. मुलाने तिला हे देखील लिहून दिले की, मी तुझ्यावर प्रेम करतो. राजानी यांनी सांगितले की, यानंतर दोघांचे बोलणे सुरू झाले आणि दोघांचे आता 10 जूनला लग्न ठरले आहे. राजानी म्हणाल्या, मुलगा आणि मुलगी दोघे मुंबईत एका खासगी कंपनीत एक्झीक्युटिव्ह पदावर काम करतात.