नवजात बालकाला जमिनीत ‘अर्ध’ पुरलं, रडला नसता तर झाला असता ‘अनर्थ’ ! ‘असा’ वाचला जीव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुरुवारी पुण्याहून एक धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेत दोन लोक नवजात बाळाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न करीत होते. आरोपींनी बाळाला अर्धे जमिनीत गाडले होते, त्याच वेळी मुलाने ओरडण्यास सुरवात केली, मुलाचे रडणे ऐकून शेतकरी तेथे आले आणि नवजात बाळाला वाचविले.

आरोपी फरार झाले
घटनास्थळी शेतकऱ्यांनी त्या आरोपींनाही पकडले होते, परंतु पोलिस येण्यापूर्वीच आरोपी शेतकऱ्यांना ढकलून फरार झाले. नवजात बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. या क्षणी नवजात बाळाची तब्येत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

काही सेकंदात अनर्थ झाला असता
ही घटना पुण्याच्या पुरंदरच्या आंबोडी परिसरातील आहे. शेतकरी म्हणाले की, दोन्ही आरोपींनी मुलाला अर्ध्ये गाडले होते आणि जर काही सेकंद उशिरा झाला असता तर त्यांनी बाळाला संपूर्ण गाडले असते. मातीमध्ये गाडल्यामुळे बाळ मोठ्या आवाजात रडत होते. सासवड पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणाले की- घटनेची माहिती आम्हाला फोनद्वारे मिळाली आणि आम्ही घटनास्थळी एक पथक पाठविले. आरोपी दुचाकीवरून आले होते, आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जप्त केले आहेत. त्यांच्यामार्फत दुचाकीचा क्रमांक शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या बाळाची ओळख पटलेली नाही.

You might also like