Video : MPच्या पोलीस महासंचालकांच ‘लज्जास्पद’ वक्‍तव्य ; म्हणाले, ‘मुलींना स्वातंत्र्य दिल्यानं अपहरणाच्या घटना वाढल्या’

नवी दिल्‍ली : वृत्‍तसंस्था – मुलींना देण्यात येणार्‍या स्वातंत्र्याबाबत मध्यप्रदेशच्या पोलिस महासंचालकांनी खुप मोठं आणि लज्जास्पद वक्‍तव्य केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलींना जास्त स्वातंत्र्य दिल्यामुळं अपहरणाच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पोलिस महासंचालक व्ही.के. सिंह हे वक्‍तव्य स्त्री अत्याचार विरोधी जनजागृती अभियानादरम्यान ग्ल्वालेर येथे केलं आहे. अपहरणासारख्या घटनांना मुलीच जबाबदार आहेत. कारण, पुर्वीपेक्षा आता मुलींना अधिक स्वातंत्र्य दिलं जातं.


मुली प्रेमामध्ये असल्यानंतर घर सोडून निघून जातात आणि त्यांचे कुटूंबिय अपहरणाची तक्रार दाखल करतात. पुढे बोलताना पोलिस महासंचालक व्ही.के. सिंह म्ळणाले की आयपीसी 369 चा एक नवा ट्रेंड पहावयास मिळत आहे. मुली अधिकच स्वातंत्र होत आहेत आणि आजच्या काळातील ही वस्तुस्थित आहे. अलिकडील काळात मुली प्रेमात असल्यानंतर घर सोडून निघून जातात आणि त्यांचे कुटूंबिय अपहरणाची तक्रार देतात अशा प्रकारच्या कमालीच्या वाढल्या आहेत. दरम्यान, पोलिस महासंचालकांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत असून तो चर्चेचा विषय बनला आहे. महासंचालकांच्या या वक्‍तव्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टिका होत असून त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये बदल करावा असे अनेकांचे म्हणणे आहे.

मध्यप्रदेशचे गृह मंत्री बाला बच्चन यांना पोलिस महासंचालक व्ही.के. सिंह यांच्या वक्‍तव्याबाबत विचारले असता त्यांनी मुलींवर अत्याचार अंकुश ठेवला पाहिजे, यापुर्वीच सरकारच्या समिक्षा बैठकीत याबाबत सर्व पोलिस अधिकार्‍यांना सूचना दिल्या असल्याचे सांगितले. मध्यप्रदेशाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबध्द असल्याचेही ते म्हणाले.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी