‘त्या’ वक्तव्याबद्दल साध्वी प्रज्ञा यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार

भोपाळ : वृत्तसंस्था – भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याच्या विरोधात मध्य प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या वक्तव्याची चौकशी सुरू असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.


काय म्हणाल्या होत्या साध्वी

भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. हे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसच्या विनय कुमार पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका करताना वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानामुळे पांडे अडचणीत आले असून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
जेव्हा लोक प्रवास करत असतात त्यांना रस्त्यावर काही बैल व गायी दिसतात.

ही भटकी जनावरं शेतकऱ्यांसाठी तापदायक असतात व कायम त्यांच्यासाठी काही ना काही व्याप निर्माण करुन ठेवतात. रस्त्यावरही या भटक्या जनावरांमुळे ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्या गायींना बघून लोक बोलतात मोदी व योगींचे वडिल रस्त्यावर बसलेत. काही बोलतात मोदींची आई रस्त्यावर झोपली आहे. असे वादग्रस्त वक्तव्य पांडे यांनी केले आहे.