मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राज्यांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीनामा देत आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कमलनाथ यांनी त्यांचा राजीनामा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडे पाठवून दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राजीनामा दिला आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे महासचिव दीपक बाब्रीया यांनी ही माहिती दिली.

या लोकसभा निवडणुकीत मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांचा देखील पराभव झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा केवळ एक उमेदवार निवडून आला आहे. उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी देखील अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या या दारुण पराभवानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील राजीनामा दिला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समिती हे राजीनामे स्वीकारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.