MP हनी ट्रॅम्प केस : पैशांच्या वसुलीमध्ये 2 पत्रकार आणि एका दैनिकाच्या मालकाचं नाव ‘चार्जशीट’मध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या सीआयडीला (CID) ‘त्या’ आयएएस अधिकाऱ्याचे नाव घेतले नाही म्हणून टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्या अधिकाऱ्याने हनी ट्रॅप गॅंगला एक कोटी रुपये दिले होते. CIDने स्थानिक वृत्तपत्राचे मालक आणि वृत्तवाहिन्यांच्या दोन पत्रकारांचे डील केल्याप्रकरणी तक्रारीमध्ये नाव दाखल केले आहे.

CID ने शनिवारी मानव तस्करी बाबत आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणी हनी ट्रॅप केसमधील एक आरोपी मोनिका यादवला माफीचा साक्षीदार बनवणार आहे.

साक्ष आणि ऑडिओ – व्हिडीओच्या पुराव्यांनी दाखल केले आरोपपत्र
मोनिका यादव यांची साक्ष, केसप्रकरणी जमा ऑडिओ आणि व्हिडीओ पुरावे यांच्या आधारावर सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, गँगमध्ये दोन सदस्य आणि पत्रकार गौरव शर्माने एका आयएएस अधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयांची वसुली केली आणि आपापसात बरोबरीने रक्कम वाटून घेतली.

गौरव शर्मा भोपाळमधील एका राष्ट्रीय टीव्ही वृत्तवाहिनीचा बातमीदार आहे. त्याच वेळी, दुसर्‍या पत्रकार वीरेंद्र शर्मा यांचेही नाव दाखल करण्यात आले आहे, जे एका वृत्त वाहिनीसाठी काम करत आहेत. यामध्ये एक राष्ट्रीय हिंदी वृत्तवाहिनी देखील आहे.

वीरेंद्र शर्मा यांनी अतिरिक्त मुख्य सचिव पी.सी. मीना यांच्याशी डील केली होती. मीनाचा हनी ट्रॅपसाठी लपून व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता. वीरेंद्र शर्मा यांनी त्यांच्या फ्लॅटवर 20 लाख रुपये घेतले होते आणि आपला हिस्सा वजा करून उर्वरित रक्कम महिलांना वाटून दिली.

राज एक्सप्रेसचे मालक अरुण सहलोत यांचे देखील नाव
मोनिका यादव यांनी सांगितले आहे की, स्थानिक वृत्तपत्र राज एक्सप्रेसचे मालक अरुण सहलोत यांचे देखील नाव घेतले आहे. सहलोत यांनीच मीनाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे सांगण्यात येत आहे.

CID ने आपल्या आरोप पत्रात म्हटले आहे की, ऑडिओ आणि व्हिडिओला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा निकाल आठ ते दहा महिन्यात येईल.

मिळालेल्या माहितीनुसार IAS अधिकाऱ्याचे नाव यासाठी घेण्यात आले नाही कारण फॉरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. आता सीआयडी दोन पत्रकार आणि एका वृत्तपत्राच्या मालकाची चौकशी करणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/