धक्कादायक ! लिव्ह इन मध्ये सासू आणि जावई, भांडण झाल्यावर ‘त्यानं’ गळा दाबला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काल एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची गळा दाबून हत्या केली. हे दोघे सासू आणि जावई असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेतला असून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळमधील अशोक विहार कॉलनीमध्ये हि घटना घडली असून शाहीन नावाची हि महिला शाहरुख नावाच्या मुलाबरोबर लिव्ह इन मध्ये राहत होती. शनिवारी रात्री काही कारणास्तव दोघांमध्ये भांडण झाले. शाहीन करत असलेल्या देहव्यापारच्या व्यवसायावरून दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शाहरुख याला तिचे ते वागणे पटत नसल्याने त्याने तिला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र तिने त्याचे ऐकले नव्हते. त्यामुळे या कारणावरून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले या भांडणात शाहरुखने तिची गळा आवळून हत्या केली.

हत्येनंतर सांगितले मित्राला
हत्या केल्यानंतर शाहरुखने याची माहिती आपल्या मित्राला दिली. त्यानंतर तो तेथून फरार झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला.

सासू आणि जावई होते नात्याने
महत्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख याने काही वर्षांपूर्वी शाहिनच्या मुलीशी लग्न केलं होते. मात्र त्यानंतर त्याच्यामध्ये आणि त्याच्या सासूमध्ये अनैतिक संबंध सुरु झाले. यासाठी तिने आपल्या पतीपासून घटस्फोट देखील घेतला. त्यानंतर दोघेजण अशोक विहारामध्ये एकत्र राहू लागले. माहितीनुसार, ती काही वर्षांपासून देहव्यापार देखील करत होती. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Visit  :Policenama.com

You might also like