थरार ! नदीत अंघोळ करताना मगरीने केला हल्ला, पुढं झालं असं काही (व्हिडीओ)

पोलिसनाामा ऑनलाईन टीम – दोन मित्र अंघोळीसाठी नदीत उतरले असताना अचानक एकावर मगरीने हल्ला केला. त्यामुळे तरुण गंभीर जखमी झाला. त्याला मगरीच्या तावडीतून सुटका केलेल्या घटनेचा संपूर्ण थरार सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Deepak_knarware/status/1270374728096780289

मध्य प्रदेशमधील भोपाळ इथले रहिवासी असलेले अमित आणि गजेंद्र अंघोळीसाठी नदीत उतरले होते. अंघोळ करताना अचानक अमितवर मगरीने हल्ला केला. अमितने जीव वाचवण्यासाठी ओरडायला सुरुवात केली. मित्र गजेंद्रने जीव धोक्यात घालून अमितचा जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. मगरीच्या हल्ल्यात अमित जखमी झाला असून सध्या त्याच्यावर शारदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गरीने पायावर हल्ला केल्याने जखमी अमित जखमी झाला आहे. हे दोन्ही तरुण नेहरुनगर पोलीस ठाणा परिसरातील रहिवासी आहेत. नदीमध्ये मगर असल्याने आता ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मगरीने हल्ला केल्यानंतर मित्राने अमितचा जीव वाचवल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ 1 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे.