दुर्दैवी ! 8 मुलांचा मृत्यू, 16 व्या वेळी आई बनली महिला, दोघांनी सोडला जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एकीकडे देशभरात लोकसंख्या नियंत्रणाबाबत चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागातील लोक त्याबाबत निष्काळजीपणाने वागत आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील घटना होय. या जिल्ह्यातील बटियागढ परिसरातील पाडाझिर गावात सुखराणी नावाच्या महिलेने 16 व्या मुलाला जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 45 वर्षीय महिलेने शनिवारी आपल्या 16 व्या मुलाला जन्म दिला, परंतु काही तासांनंतर त्या महिलेची आणि तिच्या नवजात मुलाची प्रकृती गंभीर झाली.

रुग्णालयात घेऊन जातानाच आई आणि मुलाचा मृत्यू झाला. 16 वेळा आई बनलेल्या महिलेची 4 मुले आणि 4 मुली जिवंत आहेत. त्यापैकी दोन मुलांचे लग्न झाले आहे. तर सात मुलांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. संगिता त्रिवेदी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याच वेळी सेक्टर सुपरवायझरला निलंबित केले गेले आहे. मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संगीता त्रिवेदी यांनी सांगितले की ही महिला गर्भधारणेच्या आठव्या महिन्यात 16 व्या मुलाला जन्म देत होती.

गर्भधारणेदरम्यानच्या वेदनांमुळे प्रसूती घरीच झाली होती. महिलेची प्रकृती चिंताजनक झाल्याने कुटुंबियांनी त्या महिलेस जवळच्या आरोग्य केंद्रात आणले. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी नवजात बाळाचाही मृत्यू झाला.