…त्या-त्या वेळी राज्य सरकार संकटात सापडेल, मंत्र्याच ‘सूचक’ वक्तव्य

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे मध्ये प्रदेशमधील ऑपरेशन लोटस एका फोन कॉलमुळे फसल्याची चर्चा सुरु असतानाच अजूनही कमलनाथ सरकारवरील धोका टळलेला नाही. कमलनाथ सरकारमधील एका मंत्र्याने हा दावा केला आहे. त्यामुळे मध्ये प्रदेशात येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. मंगळवारी अचानक दिल्लीला गेलेल्या १० आमदारांपैकी काही आमदार माघारी परतले आहेत तरीही सरकारपुढील अडचणी संपलेल्या नाहीत.

कमलनाथ सरकारमधील कामगार मंत्री महेंद्र सिंह सिसोदिया म्हणाले, आमचे नेते जोतिराधित्य सिंधिया यांचा जेव्हा जेव्हा अपमान केला जाईल, त्यांची उपेक्षा केली जाईल, तेव्हा तेव्हा कमलनाथ सरकार अडचणीत सापडेल आणि त्यावेळी काय होईल हे मी आत्ताच सांगू शकणार नाही, असे वक्तव्य सिसोदिया यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केले आहे.

कमलनाथ सरकार मधील १० आमदार मंगळवारी अचानक चार्टड विमानाने दिल्लीला गेले होते. ते भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र एका आमदाराने केलेल्या फोन कॉलमुळे ऑपरेशन लोटस फसले. ही माहिती मिळताच काँग्रेस नेते जीतू पटवारी यांनी दिल्लीकडे धाव घेतली आणि दिल्लीतील १० आमदारांची भेट घेऊन ६ आमदारांना परत मध्य प्रदेशला आणण्यात यश आले. त्यामुळे कमलनाथ सरकारला काहीसा दिलासा मिळाला.

उर्वरित ४ आमदार हे बंगळुरू मध्ये असल्याची चर्चा असून, अपक्ष आमदार सुरेंद्र सिंह शेरा यांनी स्वतःहूनच आपण बंगळुरू मध्ये असल्याचे सांगितले. याशिवाय काँग्रेस आमदार बिसाहूलाल सिंह, हरदीप सिंग डंग, रघुराज कंसाना हे आमदार अजून माघारी आलेले नाहीत. गुरुवारी हे विमानाने भोपाळला परततील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या उर्वरित आमदारांपैकी हरदीप सिंग डंग यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे