लेकासाठी 85 KM सायकल चालवित गाठली परिक्षा

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मुलाचे शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये आणि त्याची परीक्षा चुकू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात एका वडिलांनी तब्बल 85 किमी अंतर कापत मुलाला वेळेत परीक्षेला पोहोचवले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ पासून 250 किमी दूर धार जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला 85 किमी दूर जावे लागणार होते. यासाठी कोणतीच बस आणि गाडी लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नव्हती. अशावेऴी मुलाचे वर्ष वाया जाऊ नये आणि त्याचा पेपर चुकू नये म्हणून सकाळीच सायकलला पँडल मारले आणि वडिल-मुलगा दोघेही परीक्षा केंद्राच्या दिशेने निघाले होते. ’रुक जाना नहीं’ अभियानांतर्गत 10वी आणि 12 वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जात आहे. गणिताचा पेपर असल्यामुळे शोभाराम यांचा मुलगा आशिष याला तीन पेपर द्यायचे होते. परीक्षा केंद्र घरापासून 85 किमी लांब होते. त्यातच कोरोनाचा वाढता संसर्ग वाढत असल्याने बससेवा बंद होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचणे कठीण होते. वडिलांनी मुलाला वेळेआधी परीक्षा केंद्रावर 85 किमी सायकलचा प्रवास करून पोहोचवल्याने त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.