काय सांगता ! होय, ‘कोरोना’पासून बचावासाठी भाजपाची सत्ता असलेल्या ‘या’ राज्यानं लॉन्च केल्या ‘इम्युनिटी बूस्टर’ साडया, जाणून घ्या कसं बनवल्या

मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचा आणखी एक पर्याय समोर आला आहे, तो ऐकून आश्चर्य वाटेल, पण ते रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास प्रभावी आहे. मध्य प्रदेश सरकारने आता रोग प्रतिकारशक्ती बूस्टर साड्या सुरू केल्या आहेत. या साड्या महिलांना विषाणू आणि बॅक्टेरियापासून वाचवण्यास मदत करतील.

देशातील कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आणि बचावासाठी डॉक्टर रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याबद्दल बोलत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशात कोरोनापासून बचावासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा आणखी एक पर्याय समोर आला आहे. तसेच कोरोनापासून बचावासाठी यूपीमध्येही असेच प्रतिकारशक्ती बूस्टर कार्ड सुरू करण्यात आले आहे.

आयुर्वस्र नाव दिले गेले, विशिष्ट मसाल्यांचा होतो वापर
मध्य प्रदेशात कोरोनापासून बचावासाठी हर्बल साड्या आणि रोग प्रतिकारशक्ती बूस्टर साड्या तयार केल्या जात आहेत, त्यांना आयुर्वस्त्र असे नाव देण्यात आले आहे. या साड्या विशिष्ट पद्धतीने तयार केल्या जातात. त्या तयार करण्यासाठी बरेच मसाले वापरले जातात. यामध्ये गरम राहणारे मसाले तमालपत्र, लवंग, मोठी वेलची, चक्रफूल, दालचिनी, काळी मिरी, शाही जीरे, छोटी वेलची इ. वापरतात. या साड्यांवर सुमारे २ महिने चाचणी करण्यात आली. यानंतर अचूक उपाय करून या मसाल्यांचे मिश्रण तयार केले आणि नंतर आयुर्वस्र तयार केले गेले.

एक साडी तयार करण्यास ५ ते ६ दिवस
हे मसाले कुटून बारीक करतात आणि ४८ तासांपेक्षा जास्त काळ मसाल्याचा गठ्ठा पाण्यात ठेवून भट्टीवर या औषधयुक्त पाण्याच्या वाफेने साडी तयार करणाऱ्या कपड्याला तासनतास ट्रीट केले जाते. या दरम्यान साड्या तयार करताना बरीच खबरदारी घेतली जाते, त्यानंतर या साड्या वापरायला तयार असतात. अशा परिस्थितीत एक साडी तयार करण्यास ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो.

रोगप्रतिकार शक्तीचा प्रभाव केवळ ४ ते ५ वॉशपर्यंत टिकतो
जेव्हा या साड्या नेसल्या जातील, तेव्हा तुमची प्रतिकारशक्ती वाढते. पण असे नाही की, ती नेहमी तशीच राहील. वेगवेगळ्या मसाल्यांनी ट्रीट केलेल्या या साड्यांचा प्रभाव ४ ते ५ वॉशपर्यंत टिकतो. म्हणून खरेदीदारास सल्ला दिला जातो की, तिच्या धुण्यासाठी कमीतकमी रासायनिक समृद्ध पावडर वापरावी, जेणेकरून त्याचा प्रभाव जास्त दिवस टिकेल.

येथे मिळत आहेत साड्या
या साड्यांची किंमत ३ ते ५ हजार रुपयांदरम्यान आहे. सध्या या साड्या फक्त भोपाळ आणि इंदोरमधील मृगनयनी स्टोअरमध्येच उपलब्ध आहेत, परंतु लवकरच देशाच्या इतर राज्यांत असलेल्या मध्य प्रदेश मृगनयनी स्टोअरमध्ये उपलब्ध होतील.