ईशान-तब्बूच्या वेब सीरिजच्या किसिंग सीनवरून वाद, मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘लव्ह जिहाद’ वर कायदा बनविणाऱ्या मध्य प्रदेशात ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक मीरा नायरने बनवलेली वेब सीरिज ‘A Suitable Boy’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात चित्रित झालेल्या किसिंग सीननंतर हा वाद निर्माण झाला आहे.

मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी घेतला आक्षेप
मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वेब सीरिजमध्ये चित्रीत करण्यात आलेल्या किसिंग सीनवर आक्षेप घेतला आहे. गृहमंत्र्यांनी म्हटले की, ओटीटीच्या मीडिया प्लॅटफॉर्मवर ” अ सुटेबल बॉय ” मध्ये अतिशय आक्षेपार्ह देखावे शूट करण्यात आले आहेत, ज्यामध्ये मुस्लिम मुलगा चुंबने घेत आहे आणि पार्श्वभूमीवर भजन सूरू आहे.

ते पुढे म्हणाले, ‘यामुळे भावना दुखावल्या जातात. या दृश्यांच्या आधारावर नेटफ्लिक्स ओटीटी व्यासपीठावर आणि कार्यक्रमाचे निर्माता, दिग्दर्शकावर काय कायदेशीर कारवाई करता येईल याची चाचपणी करण्याचे निर्देश मी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, गौरव तिवारी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर ‘अ सूटेबल बॉय’ वेब सीरिजचा किसिंग सीन पोस्ट करून आक्षेप घेतला. गौरव तिवारी हे भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री आहेत. ज्या दृश्यावर आक्षेप घेण्यात आले ते दृश्य लता आणि कबीर यांच्यातील असल्याचे समजते.

अ सुटेबल बॉय या वेब सिरीजबद्दल बोलताना ती प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर यांनी बनविली आहे. लेखक विक्रम सेठ यांच्या याच नावाच्या पुस्तकावर ही मालिका आधारित आहे. या मालिकेत तब्बू व्यतिरिक्त ईशान खट्टर, नमित दास, राम कपूर, तान्या माणिक्तला आणि दानेश रिझवी यांनी काम केले आहे

You might also like