भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशात अनेक नेते, मंत्री, अधिकारी, व्यापारी, कंत्राटदार, पत्रकार काही दिवसांपासून घाबरले आहेत. कारण हे असे लोक असे जे अनाहूतपणे या प्रकरणात गुंतले गेले आहेत. आता त्यांना आपली होणारी बदनामी टाळणे अवघड झाले आहे. मध्य प्रदेशात यापेक्षा मोठा हनी ट्रॅप यापूर्वी कधीही घडला नव्हता. सनदी अधिकारी, मोठे राजकारणी अशा अनेक हायप्रोफाईल लोकांची नावे यात उघडकीस आली आहेत. त्यामुळे एसआयटी देखील या कोणाची नावे उघडकीस करावी किंवा कोणाची नावे गुप्त ठेवावी या संभ्रमात आहे.
मध्य प्रदेशात काही युवतींनी सौंदर्याच्या जाळ्यात अनेक नेते, अधिकारी यांसारख्या बड्या असामींना अडकवून, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. या प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली असून तपास सुरू आहे. त्यामध्ये 28 आमदार, 13 आयएएस, 12 व्यापारी, 4 मंत्री, 3 खासदार, 4 पत्रकार आणि एक माजी मुख्यमंत्री यादी सापडली आहे. देश भरात खळबळ माजविणाऱ्या या हनी ट्रॅपची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी सुरू झाली होती .
आयएएसचा अश्लील व्हिडिओ व्हायरल –
जून 2019 मध्ये एका मध्यप्रदेशमधील एका आय.ए.एस अधिकाऱ्याचा एका मुलीसोबतचा अश्लील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या मार्फत पोलीसांपर्यंतही पोहचला होता.
आरती दयालचे रहस्य व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाले
पोलिसांनी याविषयी तपास सुरू केला. त्यानंतर हे समजले की व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी आरती दयाल आहे. त्यानंतर अधिक चौकशी केली असता या प्रकरणात आरतीचाही हाथ आढळला. काही दिवसांपूर्वी सामान्य कुटुंबातील आरती अचानक श्रीमंत झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी आरतीच्या मोबाईलचा डेटा चेक केला तेव्हा त्यांना या प्रकरणाचा छडा लागला.
सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना केली –
या प्रकरणाची सत्यता तपासण्यासाठी सरकारने एक विशेष तपास पथक अर्थात एसआयटीची नेमणूक केली आहे. तपासाच्या सुरूवातीलाच एसआयटीला हे प्रकरण मास हनी ट्रॅपचा असल्याचे समजले. आरती ही सेक्स रॅकेट चालवण्याचं आणि ब्लॅकमेलिंग करण्याचं काम करत होती. या कामात अजून 4 तरुणींचा सहभाग होता. ही बाब तपासात उघडकीस आली.
अनेक बड्या आसामींची नावे उघडकीस आल्याने एसआयटी हैराण –
या पथकाने आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये या गँगकडून तब्बल 4 हजार व्हिडिओ ,फोटो, ऑडिओ क्लिप जप्त करण्यात आल्या आहेत. या छाप्यात काही डायऱ्याही सापडल्या असून त्यात कोडवर्ड्समध्ये अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत. यामध्ये भाजपासह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. एसआयटी देखील या कोणाची नावे उघडकीस करावी किंवा कोणाची नावे लपवावी या संभ्रमात होती. माध्यमांद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील लोकांपर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे . आता एसआयटीकडून या प्रकरणातील कमकुवत दुव्यांचा शोध सुरु आहे जेणेकरून या प्रकरणाचा पर्दापाश होईल तसेच प्रकारणात अडकलेल्या असामींची बदनामी टाळता येईल.
Visit : Policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या