हनी ट्रॅप केस : ‘मेरा प्यार’, ‘पंछी’ असे होते ‘कोडवर्ड’, 4000 पेक्षा जास्त क्लिपींग

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – मध्यप्रदेशातील हनी ट्रॅपच्या आता वेगवेगळ्या बाबी उलगडत चालल्या आहेत आणि जे काही समोर येत आहे ते धक्कादायक आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांकडून एसआयटीने एक डायरी ताब्यात घेतली. यात जाळ्यात अडकवलेल्या लोकांकडून वसूल केलेली रक्कम याशिवाय वापरण्यात येणाऱ्या कोडवर्डचा वापर देखील करण्यात आला आहे. मेरा प्यार आणि पंछी असे कोड ग्राहकांसाठी ठेवले आहेत. एकदा वीआयपी या कोडवर्डचा देखील उपयोग करण्यात आला आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या या पाच महिलांमधील एक महिला रिवेरा टाऊनमध्ये राहते. तिच्याकडून अनेक व्हिडिओ क्लिप आणि फोटो जप्त करण्यात आले, तसेच एक डायरी देखील ताब्यात घेण्यात आली. यात अनेक वर्षापासूनचा लेखाजोखा आहे. या डायरीत मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मधील अनेक नेत्यांची नावे आहेत तसेच या नेत्यांकडून करण्यात आलेल्या वसूलीची रक्कम लिहिली आहे.

या तपासात पोलिसांच्या हाती काही कागदपत्र लागली आहेत. जे एका महिलेच्या डायरीची पाने असल्याने म्हणले जात आहे. यात मध्यप्रदेशमधील अनेक जबाबदार नेत्यांची नावे आहेत जे आता दिल्लीत जबाबदारी संभाळत आहेत. याशिवाय यात अनेक माजी नेते आणि माजी खासदार यांची नावे असल्याची चर्चा आहे.

कोडवर्डचा वापर –
डायरीची ही पाने सांगत आहेत की ही टोळी कार्डवर्डचा वापर करत होती. या कोडवर्डमध्ये पंछी आणि मेरा प्यार असे कोडवर्ड आहेत. या कोर्डवर्डमध्ये हसणारे चेहरे आणि ह्दयाची चित्र देखील आहेत. याशिवाय कोणत्या व्यक्तीकडून किती रक्कम वसूल केली किती बाकी आहे हे देखील लिहिले आहे. या पानांवरुन आणखी एक बाब स्पष्ट होते ती म्हणजे एका व्यक्तीला जाळ्यात अडकवण्यात कोणाकोणाची भूमिका काय आहे, वसूल करण्यात आलेल्या रक्कमेत कोणाचा किती वाटा आहे हे देखील लिहिले आहे.

वीआयपी कोडवर्डच्या यादीत अनेक नेते –
एसआयटीच्या सूत्रांच्या मते पंछी या कोडवर्डचा वापर त्या व्यक्तींसाठी करण्यात येत होता जे व्यक्ती धनाढ्य होते आणि त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येणार होती. याशिवाय टोळीतील सर्वात कमी वयाच्या तरुणींद्वारे जाळ्यात अडकवलेल्या लोकांसाठी मेरा प्यार हा कोडवर्ड वापरण्यात येत असे. याशिवाय मोठ्या नेत्यांना वीआयपी कोडवर्ड श्रेणीत समाविष्ट केले जात होते.

डायरीमध्ये एका एनजीओचा उल्लेख देखील आहे. ही डायरी त्या महिलेकडून मिळाली, जिचा पती एनजीओ चालवत होता. या डायरीतील लिखाण या महिलेचे आहे की दुसऱ्या कोणाचे हे अजून स्पष्ट झाले नाही. इंदौर पोलिसांनी इंजिनिअर हरभजन सिंह यांच्या तक्रारीनंतर पाच महिला आणि एका पुरुषाला ताब्यात घेतले.

क्लिपिंगच्या 4,000 पेक्षा जास्त फाइल –
या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांकडून मोबाइल, लॅपटॉप आणि पेनडाइव्ह ताब्यात घेण्यात आले, त्यात मोठ्या प्रमाणात व्हिडिओ क्लिप मिळाल्या. क्लिपिंगच्या 4,000 पेक्षा जास्त फाइल जप्त करण्यात आल्या. या टोळीतील महिला व्यक्तींना जाळ्यात अडकवल्यानंतर गुप्त पद्धतीने व्हिडिओ क्लिप तयार करत होत्या.

Visit : Policenama.com