हनीट्रॅप सेक्स स्कँडल : पोलिसांच्या हाती लागले 100 हून अधिक व्हिडीओ , काँग्रेस-भाजपच्या अनेक नेत्यांना ‘धोका’

इंदोर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचं ‘हनीट्रॅप सेक्स स्कँडल’ सहा वर्षांपूर्वी उघड झालेल्या व्यावसायिक परीक्षा मंडळाची (व्यापम) आठवण करून देणारं आहे. या स्कँडलचा धागा नोकरशाही-पांढऱ्या कपड्यामधील लोकांच्या आसपास फिरताना दिसत आहे. 100 हून अधिक व्हिडीओ आणि 200 हून अधिक फोन नंबर पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे राजकीय वादळ निर्माण होऊ शकतं. गेल्या काही दिवसात ‘हनी ट्रॅप सेक्स स्कँडल’मधील समोर आलेले महिलांचे बड्या नेत्यांसोबतचे फोटो आणि एका अधिकाऱ्यासोबत समोर आलेला व्हिडीओ हे सिद्ध करतात की, या टोळीचा राजकारण नोकरशाहीत हस्तक्षेप झाला आहे.

एका आठवड्यापूर्वीच इंदोर पोलिसांनी दोन महिलांना त्यांच्या वाहन चालकांसहित अटक केली होती. या महिला नगरपालिकेचे अभियंता हरभजन सिंह यांचा व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल करत 3 कोटींची मागणी करत होत्या. मागितलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून 50 लाख घेण्यासाठी त्या महिला आल्या तेव्हा त्या पकडल्या गेल्या. मागील सात दिवसांत या स्कँडलशी संबंधित जे फोटो समोर येत आहेत ते चकित करणारे आहेत.

हनीट्रॅप सेक्स स्कँडलसोबत जोडली जात आहेत काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची नावे
या प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. सोबतच सत्ताधारी पक्ष काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांची नावेही हनीट्रॅप सेक्स स्कँडलसोबत जोडली जाताना दिसत आहेत. अद्याप पोलिसांनी कोणत्याही नेत्याकडे बोट दाखवले नाही. परंतु अशा चर्चा होताना दिसत आहेत की, हनीट्रॅप सेक्स स्कँडलमधील महिलांसोबत नेत्यांचा संबंध आहे.

Visit : policenama.com