राजकारणात भूकंप ! हनीट्रॅपमध्ये Ex CM, नेते, अधिकारी, मॉडल, कॉल गर्ल्स आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री, प्रचंड खळबळ

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासह अनेक नोकरशहा आणि नेते मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये मोठ्या ब्लॅकमेलिंग सिंडिकेटच्या हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत, जे काही बॉलिवूड अभिनेत्रींसह ४० हून अधिक कॉल गर्ल्सच्या संपर्कात होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मुली पुरविण्यात आल्याचा आरोप आहे. यात सहभागी अधिकारी आणि राजकारण्यांच्या ९२ आक्षेपार्ह स्थितीतील उच्च-गुणवत्तेच्या(HD) व्हिडिओ क्लिप सापडल्या आहेत. सेक्स ब्लॅकमेलिंग आणि खंडणी रॅकेटच्या आरोपाखाली अटक केलेल्या पाच महिलांकडून दोन लॅपटॉप व अनेक मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

अतिरिक्त पोलिस महासंचालक (ADGP) संजीव शमी यांच्या नेतृत्वात MP पोलिसांची विशेष तपासणी पथके ज्या ठिकाणी कॉल गर्ल्सने किंवा ज्या महिलांनी लैंगिक संबंध आणि ब्लॅकमेलिंग रॅकेट्स चालविली होती त्या स्थानाशी व्हिडिओ क्लिप जुळवून पुरावे गोळा करीत आहेत. त्याचवेळी कॉंग्रेस सरकार भाजप नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी सीबीआयसारख्या स्वतंत्र एजन्सीकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

रॅकेटच्या सूत्रधाराला अटक :
SIT च्या सूत्रांनी सांगितले की, लैंगिक रॅकेटची मुख्य सूत्रधार श्वेता स्वप्निल जैन हिला एसआयटीने अटक केली, जिने राज्य सरकारच्या महत्त्वाच्या कार्यालयात काम करणाऱ्या राजकारणी व अधिकाऱ्यांना हनीट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी कॉलगर्ल्स ची व्यवस्था केली होती. एसआयटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात श्वेताचे पती स्वप्निल जैन यांच्याकडून पाच हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या आहेत. ते म्हणाले, “नोकरशहा किंवा मंत्र्यांशी झालेल्या प्रारंभिक भेटीनंतर श्वेता त्यांना गेस्ट हाऊस किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये लैंगिक संबंधांसाठी मुली पुरवत असे. त्याचवेळी हे अधिकारी आणि नेता जेव्हा त्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवत, तेव्हा त्यांचा व्हिडिओ छुप्या कॅमेर्‍याने रेकॉर्ड केला जात होता.”

असे आहे प्रकरण :
अधिकृत दौर्‍यावर मुंबई किंवा दिल्लीला गेलेल्या ‘सावज’ (नोकरशहा आणि राजकारणी) यांना जाळ्यात अडकवण्यासाठी बऱ्याचदा मॉडेल्स आणि बॉलिवूड अभिनेत्री पुरवली जात असे. तथापि, एसआयटीला अद्याप अशी कोणतीही व्हिडिओ क्लिप मिळाली नाही ज्यामध्ये नामांकित अभिनेत्री सेक्स करताना दिसत आहे. श्वेताने चौकशीदरम्यान कबूल केले की, तिने तिच्या एनजीओसाठी मंत्री किंवा सचिवांकडून आकर्षक सरकारी कंत्राटे मिळवण्यासाठी हनीट्रॅपसाठी मुली पुरवल्या होत्या.

सूत्रांनी सांगितले की, श्वेताने कबूल केले की, तिच्या पतीद्वारे चालवल्या जाणाऱ्या स्वयंसेवी संस्थेला भोपाळ महानगरपालिकेकडून आठ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले होते. पीडब्ल्यूडी, गृहनिर्माण, समाज कल्याण आणि इतर सरकारी महामंडळांसारख्या राज्य सरकारच्या विविध विभागांकडूनही अशी अनेक कंत्राटे घेण्यात आली होती. श्वेताने हेही कबूल केले की मध्य प्रदेशच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी तिला भोपाळ येथील मीनल रेसिडेन्सीमध्ये एक बंगला भेट दिला होता.

काँग्रेसची प्रतिक्रिया :
सेक्स रॅकेटमध्ये माजी मंत्री आणि नोकरशहा यांच्या सहभागावर प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते के. मिश्रा म्हणाले की, भोपाळ, इंदूर आणि मध्य प्रदेशातील अन्य प्रमुख शहरांमध्ये हे रॅकेट चालविण्यात येत आहे. “हे (रॅकेट) वर्षानुवर्षे चालू होते, त्यामुळे ब्लॅकमेलमध्ये सामील झालेले ८० टक्के नेते भाजपचे होते. सर्व नेत्यांची नावे पोलिसांना मिळाली आहेत, परंतु नेता किंवा नोकरशहा अटक होईपर्यंत मी कुणाचेही नाव घेणार नाही.”

कॉंग्रेस नेत्यांच्या सहभागाबद्दल मिश्रा यांना विचारले असता या हनीट्रॅप प्रकरणात सुमारे २० टक्के कॉंग्रेसचे नेते यात सामील असल्याचे सांगितले. हा घोटाळा उघड करणाऱ्या मिश्रा यांनी IANS ला सांगितले की, “या प्रकरणात पाठिंबा देण्यात सहभाग सिद्ध झाल्यास आम्ही कॉंग्रेसच्या लोकांनाही अटक करू. पण या घोटाळ्यातील बहुतेक नेते भारतीय जनता पक्षाचे आहेत.”

श्वेता जैन शिवाय, एसआयटीने अटक केलेल्या आरती दयाल या दुसर्‍या महिलेने चौकशी दरम्यान कबूल केले की, MP केडरच्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याशी तिचा संपर्क आला होता ज्याने तिची अनेक मोठ्या नेत्यांशी ओळख करून दिली होती. आरती म्हणाली की ती भोपाळमध्ये एका आयएएस अधिकाऱ्यास ती सतत सेवा पुरवत असे. या अधिकाऱ्याने तिला भोपाळमध्ये एक फ्लॅट दिला होता.

नंतर या फ्लॅटमध्ये आरतीने सर्व प्रकारची बेकायदेशीर कामे केली. फ्लॅटच्या काही खोल्यांमध्ये राजकारणी, नोकरशहा आणि उच्च सरकारी अभियंत्यांनी कॉलगर्ल सह लैंगिक संबंध ठेवल्या आहेत ज्यांचे चित्रीकरण छुप्या कॅमेऱ्यात झाले आहे. आरतीने स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी कॉल गर्ल्सची नेमणूकही केली.

चौकशीनंतर गुन्हे दाखल होणार :
रॅकेटचा मुख्य सूत्रधार श्वेताप्रमाणेच आरतीनेही एक स्वयंसेवी संस्था स्थापन केली होती आणि मुली पुरवण्याच्या मोबदल्यात संबंधित मंत्र्यांकडून कित्येक मोठे कंत्राट घेतले. आरती यांनी असेही स्पष्ट केले की केवळ काही प्रकरणांमध्येच राजकारणी किंवा नोकरशहांना व्हिडिओ दाखवून कॉन्ट्रॅक्ट मिळवावे लागले अन्यथा बहुतेक प्रकरणांमध्ये स्वत: नेते आणि नोकरशहा लैंगिक सेवेच्या बदल्यात मोठी कंत्राटे स्वतःहून देत. व्हिडीओ क्लिपच्या फॉरेन्सिक तपासणीनंतर ब्लॅकमेल करणार्‍या व्यक्तीची ओळख पटवली जाईल, अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली. त्यानंतरच, लैंगिक सेवेच्या बदल्यात कंत्राटे देणाऱ्या हाय प्रोफाइल व्यक्ति (नेते आणि नोकरशहा) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला जाईल.

Visit : policenama.com