Coronavirus : इंदोरमध्ये ‘कोरोना’मुळं आणखी एका व्यक्तीचा मृत्यू, शहरात आतापर्यंत 8 मृत्यूंची नोंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोनाने सर्वाधिक प्रभावित मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कोविड -19 संक्रमणामुळे रविवारी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे शहरात आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. इंदोरचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण जाडिया यांनी ही माहिती दिली. दरम्यान राज्यात इंदोर शहरावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. माहितीनुसार आतापर्यंत मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणार्‍या इंदोरमध्ये 135 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

मध्य प्रदेशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशात कोरोना विषाणूमुळे ग्रस्त रूग्णांची संख्या वाढून 182 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इंदूरमध्ये आतापर्यंत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उज्जैनमध्ये 7 पैकी 2 पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जबलपूरमध्ये 8, मुरेना येथे 12, भोपाळमध्ये 15, बरवानी येथे 3, ग्वाल्हेरमध्ये 2 आणि शिवपुरीमध्ये 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर खरगोनमध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे छिंदवाड्यातही कोरोना पॉझिटिव्ह 2 रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

देशात कोविड – 19 मुळे आतापर्यंत 77 मृत्यू : आरोग्य मंत्रालय
दरम्यान, रविवारी देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण वाढून 3,374 झाले आणि मृतांची संख्या 77 वर पोहोचली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड – 19 मुळे मध्ये अद्याप 3,030 लोक संक्रमित आहेत, तर 266 लोक स्वस्थ झाले असून त्यांना दवाखान्यातून सोडण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत अद्ययावत केलेल्या आकडेवारीत मंत्रालयाने आणखी दोन जणांच्या मृत्यूची माहिती दिली. एक मृत्यू कर्नाटक आणि दुसरे तामिळनाडूमध्ये झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like