रेल्वेतील ‘मसाज’ भारतीय ‘संस्कृती’च्या विरोधात ; ‘या’ भाजपच्या खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना ‘साकडे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवासाच्या दरम्यान मसाजची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याचे मत इंदौरचे खासदार शंकर लालवाणी यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र देखील लिहिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले की, महिलांच्या उपस्थितीत अशा पद्धतीची सुविधा देणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात आहे.

लालवानी यांनी १० जूनला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, महिलांच्या उपस्थितीत अशा प्रकारची सुविधा देणे भारतीय संस्कृतीच्या विरोधात नाही? रेल्वेतील प्रवाशांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करा, माझ्या मते या असल्या सुविधांपेक्षा रेल्वेसाठी डॉक्टरांची जास्त गरज आहे.

लालवाणी यांनी म्हटले की, जर अशाप्रकारच्या सुविधा शताब्दी किंवा राजधानी रेल्वेत उपलब्ध करून दिल्या असत्या, तर मी समजून घेऊ शकलो असतो. पण प्रवासी रेल्वेत मसाज सारखी सुविधा देणे योग्य नाही. पॅसेंजर रेल्वेतून प्रवास करणारे प्रवासी हे गरीब आहेत आणि त्यांचा प्रवास ४ ते ५ तासांचा असतो. मग अशा परिस्थितीत मसाजची सुविधा कशाला पाहिजे. ही सुविधा एकदम चुकीची आहे आणि बऱ्याच महिला संघटनांनी या विरोधात तक्रार केली आहे.

रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे ही मसाज योजना पुढील काही आठवड्यात सुरु करणार आहे. हि सुविधा इंदौर मधून निघणाऱ्या ३९ रेल्वेमध्ये उपलब्ध होणार आहे.

अशी असेल मसाज योजना

रेल्वेच्या या सुविधेची विभागणी गोल्ड, डायमंड आणि प्लेटिनम अशी करण्यात आली आहे. गोल्ड विभागात ऑलिव ऑईल वापरण्यात येईल. यासाठी प्रवाशांना १०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. डायमंड विभागातील शुल्क २०० रुपये राहील. यामध्ये सुगंधित तेलाचा वापर केला जाईल. प्लॅटिनम कॅटेगिरीत क्रीमचा उपयोग केला जाईल. त्याचे शुल्क ३०० रुपये असेल. हि सर्व सुविधा १५ ते २० मिनिटात देण्यात येईल.

सिनेजगत

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

#MeToo : अभिनेत्री तनुश्री दत्‍ता आणि नाना पाटेकर, आरोप प्रकरणाची मोठी बातमी ; घ्या जाणून

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित

‘डीप नेक’ ड्रेसमध्ये इलियाना डिक्रूजचा ‘बोल्ड’ वीडियो व्हायरल, दिलकश अदाने चाहत्यांना केले ‘घायाळ’