‘शिवभोजन’ थाळीला 26 जानेवारीपासून ‘शुभारंभ’ ! महिला बचत गटांना देणार केंद्र चालवण्यासाठी प्राधान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात पहिल्या टप्प्यात 50 ठिकाणी शिवभोजन केंद्र उभारणार असल्याची घोषणा झाल्यानंतर आता या योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीपासून होणार आहे. राज्यातील गोरगरिबांसाठी, गरजूंना स्वस्तात जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेची जबाबदारी महिला बचत गटांकडे देण्यात येणार आहे.

10 रुपयांत जेवणाची थाळी योजनेचा शुभारंभ 26 जानेवारीला होईल. हे केंद्र चालवण्यासाठी महिला बचत गटांना जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे. महिला बचत गटातील महिलांना यासंबंधित प्रशिक्षण देखील देण्यात येईल. त्या त्या जिल्ह्यातील पालकमंत्री शिवभोजनाच्या योजनेचा शुभारंभ करतील असे देखील वृत्त आहे.

शिवसेनेने सत्तेत येण्याआधी आपल्या वचननाम्यात शब्द दिला होता की राज्यातील गोरगरिबांना फक्त 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करुन देण्यात येईल. यानंतर राज्यात महाविकासआघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 रुपयांच्या शिवभोजन थाळीची घोषणा केली होती. यासंबंधित माहिती हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देण्यात आली. त्यानंतर या संबंधित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ट्विट देखील केले होते.

ट्विटमध्ये लिहिले होते की महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला 10 रुपयांमध्ये सकस आणि परवडणारे ‘शिवभोजन’ देण्याची महाराष्ट्र विकास आघाडीची महत्वाची घोषणा आहे ! सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 50 ठिकाणी ‘शिवभोजन’ केंद्रे सुरु करणार आहोत आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची सुरुवात होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –