5 दिवसांत 2 विवाह ! पुन्हा गायब झाला नवरा, पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    खंडवा (मध्य प्रदेश) मध्ये एका व्यक्तीने पाच दिवसांत दोन मुलींशी लग्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, लग्नापासून नवरासुद्धा बेपत्ता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडवा पोलिस स्टेशनचे प्रभारी बीएल मंडलोई यांनी सांगितले की, शनिवारी एका मुलीच्या कुटूंबाने याबाबत तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाच दिवसात दोन लग्न करणारा हा व्यक्ती 26 वर्षांचा असून तो इंदूरच्या मुसाखेडी भागातील आहे. या तक्रारीनुसार, या व्यक्तीने खंडवा येथील एका मुलीशी 2 डिसेंबर रोजी लग्न केले आणि त्यानंतर 7 डिसेंबरला इंदूर जिल्ह्यातील महू तहसील गावात आणखी एका मुलीशी लग्न केले.

दुसर्‍या लग्नात मुलीच्या नातेवाईकांची ओळख पटली

पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, त्याच्या दुसर्‍या लग्नात खंडवा येथील एक व्यक्ती होती. हा व्यक्ती पहिल्या मुलीच्या नातेवाईकांमधील एक होता. त्यांनी वराला ओळखले आणि एक फोटो काढून तो पहिल्या मुलीच्या कुटुंबात पाठविला.

यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतरच शनिवारी खंडवा येथील मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली. लग्न आणि वधूला दिलेल्या वस्तूंमध्ये सुमारे 10 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचेही कुटुंबीयांच्या तक्रारीत म्हटले आहे. इतकेच नाही तर मुलीला लग्नानंतर त्या व्यक्तीने इंदूर येथील आपल्या घरीही नेले. काही दिवसांनी त्याने मुलीला सांगितले की, तुला भोपाळला जावे लागेल. त्याने काही तातडीच्या कामासाठी निमित्त केले. यानंतर तो महूला गेला जिथे त्याने पुन्हा लग्न केले. दुसर्‍या लग्नानंतर तो अद्याप घरी आला नाही. तसेच त्याचा मोबाइल फोनही बंद आहे.