चमत्कार ! मजूरांचे रातोरात बदलले होते नशीब, खोदकामात जमिनीत गाडलेला लाखो रुपयांचा ‘खजिना’ मिळाला

पन्ना : वृत्तसंस्था –  नशीबाचे काही खरे नसते, कधी बदलेल सांगू शकत नाही. असेच काहीसे मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील काही मजुरांच्या बाबतीत घडले होते. त्यांना खोदकामात जमीनीत तीन मौल्यवान हिरे (Diamonds) सापडले होते. या घटनेवर स्वता त्या मजूरांचा सुद्धा विश्वास बसत नव्हता, की त्यांचे नशीब रातोरात बदलले आहे.

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा Ration Card; जाणून घ्या ऑनलाइन अप्लाय करण्याची संपूर्ण प्रोसेस

पन्ना जिल्ह्यातील जरुआपुर उथली खाणीत काम करताना मजूरांना हिरे (Diamonds) मिळाले होते.
हिर्‍यांचे वजन वेगवेगळे 4.45,  2.16,  0.93 कॅरेट होते. तिनही हिर्‍यांचे एकुण वजन 7.59 कॅरेट होते.
हे जेम क्वालिटीचे हिरे होते तिनही हिर्‍यांची बाजारातील एकुण किंमत 30 ते 35 लाख रुपये झाली होती.
मात्र, तिनही हिरे पन्नाच्या कार्यालयात जमा करण्यात आले होते. लिलावानंतर ही रक्कम मजूरांना वाटण्यात आली होती.

Pune : पुण्यात लाचखोरी रोखण्यासाठी ‘गुगल पे’ची ‘मात्रा’?

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्याच्या जरुआपुरमध्ये उथळी हिर्‍याची खाण आहे.
गावातील मजूर सवल सरदारला हिरे कार्यालयाने खासगी क्षेत्र जरुआपुरमध्ये उत्खननासाठी 8 बाय 8 मीटरचा पट्टा दिला होता.
मजूर सवल सरदार याच खाणीत खोदकाम करत होता या दरम्यान त्यांना तीन हिरे सापडले.
सवल सरदार सोबत आणखी सहा मजूर काम करत होते.

12 वीच्या विद्यार्थ्यांना कोरोना लस देणार का? सरकारने कोर्टात सांगितलं

हिरे मिळताच सर्वजण आनंदाने बेभान झाले.
यानंतर या हिर्‍यांबाबत कार्यालयाला माहिती देण्यात आली होती.
नंतर ते पन्नाच्या डायमंड कार्यालयात जमा करण्यात आले होते.
येथे हिर्‍यांचा लिलाव झाला होता, यानंतर त्यांची रॉयल्टी कापून उर्वरित पैसे जमकत्यांना दिले गेले होते.
सवल सरदार सांगितले होते की, 2 महिल्याच्या प्रचंड मेहनतीनंतर त्यांना 3 हिरे मिळाले होते.

Gold Silver Price Today : खुशखबर ! 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी स्वस्त अन् चांदी देखील घसरली, जाणून घ्या आजचे दर

आणखी एक टेन्शन ! मुलांमध्ये कोरोनानंतर आता ‘या’ आजाराने वाढवली चिंता, जाणून घ्या काय आहे नवीन संकट

Ethanol Blending Petrol : मोदी सरकारने डेडलाईन बदलली, पेट्रोलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका (व्हिडीओ)