लज्जास्पद ! शिक्षक पत्नीच्या मदतीनं करत होता मुलीवर बलात्कार, दोघांना अटक

मरैना/मध्य प्रदेश : वृत्तसंस्था – मानव जातीला काळीमा फासणारी घटना मध्य प्रदेशातील मुनौर जिल्ह्यात घडली आहे. मुनौर जिल्ह्यातील पोरसा गावातील शिक्षकाने आपल्या पत्नीच्या मदतीने आपल्याच 16 वर्षाच्या मुलीचे हात-पाय बांधून बलात्कार करत असल्याचे समोर आले. या प्रकरणात पत्नी शिक्षक पतीला मदत करत होती. या प्रकरणातील दोषी दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिकारी अवनीश बन्सल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात या घटनेचे सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षक आणि त्याच्या पत्नीला मंगळवारी अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी पीडित मुलगी आणि आरोपी वडीलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. बन्सल यांनी सांगितले की इतरांना याबाबत समजू नये म्हणून या दाम्पत्याने पीडित मुलीला घरात कोंडून ठेवले होते. ते म्हणाले की, त्रस्त पीडित मुलीने आपल्या विवाहीत बहिणीला सोमवारी या प्रकाराबाबत सांगितले. त्यानंतर मोठ्या बहिणीने चाईल्ड हेल्पलाइनवर याची तक्रार केली.

चाईल्ड हेल्पलाईनच्या सदस्यांनी मंगळवारी मुलीला सोडवल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी पती-पत्नीकेडे चौकशी केली आणि त्यांना अटक केली. बन्सल यांनी पुढे सांगितले की, पीडित मुलीने आपल्या तक्रारीत असे सांगितले आहे की, तिच्या शिक्षक वडिलांनी 26 मार्च आणि 10 एप्रिल रोजी तिच्यावर दोनदा बलात्कार केला होता. आणि तिच्यावर बलात्कार करण्यापूर्वी तिचे हात-पाय बांधले जात होते.

तक्रारीनुसार पीडित तरुणीच्या आईने आरोपीला या गुन्ह्यात मदत केली आणि तिला घरात ठांबून ठेवले. बन्सल यांनी सांगितले की, पीडितेने सांगितले आहे की बलात्काराला विरोध केला असता आरोपी तिला नग्न करून मारहाण करत होता. तसेच तिला चावत होता. पीडित मुलीच्या अंगावर चावल्याच्या खुणा दिसत आहेत. या संदर्भात मुनौर जिल्हाधिकारी प्रियंका दास म्हणाल्या, शिक्षकाने स्वत:च्या मुलीवर बलात्कार केल्याची ही घटना लजास्पद आहे. नियमानुसार शिक्षकाला लवकरच निलंबित करण्यात येईल. कारण त्याने शिक्षक पदाला काळीमा फासला आहे.