धक्कादायक ! अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय आल्यानंतर पत्नीनं दिली खूनाची सुपारी

बैतुल : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये पतीच्या खून प्रकरणात त्याची पत्नीच मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला आल्याने या दोघांमध्ये सतत वाद होत होते. पतीसोबत होत असलेल्या वादातून कायमची सुटका करुन घेण्यासाठी पत्नीनेच पतीच्या खूनाची सुपारी दिली. त्यासाठी तिनं दोन लाख रुपये मारेकऱ्यांना दिल्याचे स्पष्ट झालं आहे.

पती संतुलाल हा होशंगाबादमध्ये आयुष विभागात कंपाऊंडर म्हणून काम करत होता. तर त्याची पत्नी होशंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय संतुलाल याला होता. या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. सतत होणाऱ्या वादाच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी पत्नीने पतीच्या खूनाची सुपारी दिली. पत्नीने आपल्या एका नातेवाईक महिलेच्या मदतीनं एका गुंडाला पतीच्या खूनाची सुपारी दिली. यासाठी तिने गुंडाला दोन लाख रुपये दिले. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने 28 जून रोजी पती संतुलाल उईके हे बेपत्ता असल्याची तक्रार बैतुलच्या चिचोली पोलीस ठाण्यात दिली. संतुलाला हा चिचोलीजवळील चंडी दरबारमध्ये आला होता, मात्र तो घरी परतला नाही असे पत्नी संगिताने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला असता 4 जुलै रोजी त्याची दुचाकी बैतुल बाजार ठाण्याच्या हद्दीत सापडली. याचा शोध पोलिसांनी घेतला असता संतुलाल याच्या पत्नीनेच नातेवाईक महिलेच्या मदतीने आपल्या पतीच्या खूनचा कट रचल्याचे समोर आले.

संतुलाल याचा मृतदेह 10 जुलै रोजी आढळून आला होता. भावाने मृतदेहाची ओळख पटवली या प्रकरणात पोलिसांनी आरोपी संगिता हिच्यासह कम्मे उइके, सतीश बटके, श्रीराम उईके, भारत धुर्वे नीलेश खातरकर आणि संतराम धुर्वे यांना अटक केली आहे. तिचा पती चारित्र्याच्या संशयावरून दारु पिऊन छळ करत होता. तसेच मारहाण करत असल्याचे आरोपी संगिताने सांगितले.