Madhya Pradesh News | धक्कादायक ! प्रेयसीच्या त्रासामुळे त्याने केली 5 जणांची हत्या, शेतात पुरले मृतदेह

मध्यप्रदेश / देवास : वृत्तसंस्था (Policenama Online) – मध्यप्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील देवास जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. त्या जिल्ह्यातील 5 जणांची हत्या (Murder) करून मृतदेह खोल खड्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या प्रेयसीमुळे त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने आपल्या साथीदारांच्या मदतीने हे हत्याकांड (Murder) केल्याचे पोलीस (Police) तपासात उघडकीस आले आहे. सुरेंद्र चौहान (Surendra Chauhan) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणावरून आतापर्यंत 6 जणांना पोलिसांकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अधिक माहितीनुसार, मध्यप्रदेश (Madhya Pradesh) येथील देवास जिल्ह्यातील काही अंतरावर असलेल्या नेमावरमध्ये एका शेतामध्ये पोलिसांनी मंगळवारी (29 जून) रोजी सायंकाळी जमीन खोदून 5 जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे हे पाच जणही मागील 13 मेपासून बेपत्ता (Disappeared) होते. तर पोलीस त्यांचा वारंवार शोध घेत होते. ते पाच बेपत्ता झालेल्या मध्ये 1 महिला, 3 युवती आणि एका युवकाचा समावेश होता. ममता मोहनलाल कास्ते (वय, 45), रूपाली मोहनलाल (वय, 21), दिव्या मोहनलाल (वय,14) पूजा रवी ओसवाल (वय, 15), पवन रवि ओसवाल (वय,14) असे मृतांची नवे आहेत.

दरम्यान, मुख्य आरोपी सुरेंद्र (Surendra Chauhan) याचे एका युवतीशी प्रेम प्रकरण (Love affair) सुरू होते व त्यातून हे भीषण हत्याकांड (Murder) केले गेले असल्याचे समजते. पोलिसांनी तपास केल्यावर एकेक करून त्यांनी हत्याकांडाशी संबंधित 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेला रस्त्यावर सुरेंद्र चौहानच्या शेतामध्ये खड्ड्यात पुरलेले पाचही मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने जवळ जवळ 10 फूट खोदकाम करून मृतदेह ताब्यात घेतले आहे. या सर्व घडामोडीवरून आता पोलीस या हत्याकांडाचा संबंध शेताचा मालक सुरेंद्र याच्याशी जोडून तपास करत आहेत.

Web Titel :- Madhya Pradesh News | lover killed five people because his girlfriends troubles

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल