MP : एम्स मधून ड्युटी करून घरी जात असताना डॉक्टरांना पोलिसांची मारहाण, एकाचा हाथ फ्रॅक्चर

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे डॉक्टरांनी पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मिळलेल्या माहितीनुसार, लॉक डाऊन काळात रूग्णालयाच्या डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप पोलिसांवर केला आहे. बुधवारी सायंकाळी एम्समधून ड्युटीनंतर घरी जाणाऱ्या 2 पीजी डॉक्टरांना पोलिसांनी मारहाण केली. माहितीनुसार, ही मारहाण इतकी जबरदस्त होती की, पोलिसांनी केलेल्या मारहाणीनंतर एका डॉक्टरचा हात फ्रॅक्चर झाला.

याबबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भोपाळ मधील एम्सचे फॉरेंसिक मेडिसिन डिपार्टमेंटचे पीजी डॉक्टर ऋतू परना आणि डॉक्टर युवराज संध्याकाळी ०६:३० वाजता एम्सच्या मागे असलेल्या आपल्या घराकडे जात होते. त्यावेळी २ पोलिसांनी त्यांना रस्त्यातच थांबवले. आणि शिवीगाळ करू लागले. डॉक्टर युवराज यांनी सांगितले की, तिथे आलेल्या पोलिसांनी काहीही ऐकून घेण्याच्या आधी दंडुक्याने मारहाण करायला सुरुवात केली. ते म्हणाले, आम्ही जेव्हा आय. डी . कार्ड दाखवायला लागलो तेव्हा त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. आमचे सामान सुद्धा फेकून दिले. पोलिसांनी इतकी जबर मारहाण केली की यात डॉक्टरचा हात फ्रॅक्चर झाल्याची बाब देखील समोर आली आहे.

एम्सच्या निवासी डॉक्टर असोसिएशनने मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि डीजीपी यांच्यासह सर्व मोठ्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून हे प्रकरण अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेश कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या राज्यांपैकी एक आहे. या राज्यात या धोकादायक विषाणूमुळे 200 हून अधिक लोक बाधित झाले आहेत आणि जवळपास 13 लोकांचा यात मृत्यू झाला आहे.