Madhya Pradesh Political News | ‘मेनका गांधी घटीया महिला’, भाजप आमदाराच्या ट्विटने खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन टीम (policenama online) – मध्य प्रदेशच्या राजकारणात (Madhya Pradesh Political News) गदारोळ उडाला आहे. कारण भाजपचे आमदार अजय बिष्णोई (BJP MLA Ajay Bishnoi) यांनी त्यांच्याच पक्षाच्या खासदार मेनका गांधी (MP Maneka Gandhi) यांच्यावर टीका केली आहे. खासदार मेनका गांधी या घटीया महिला आहेत. त्या माझ्या पक्षाच्या खासदार आहेत, याची मला लाज वाटते, अशा शब्दात आमदार बिष्णोई टीकास्त्र सोडलं आहे. आमदाराने स्वपक्षीय खासदारावर अशा शब्दात टीका केल्याने आश्चर्य केले जात आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

खासदार मेनका गांधी यांनी जबरलपूरमधल्या एका पशूंच्या डॉक्टरशी बोलताना काही विधाने केली होती. जी आमदार अजय बिष्णोई यांना आवडली नाहीत. त्यांच्या या विधानामुळे जबलपूरवासी नाराज असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच आमदारांनी ही टीका केली आहे. आमदार बिष्णोई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की खासदार मेनका गांधी यांनी पशुचिकीत्सक विकास शर्मा यांच्याशी बोलताना जे शब्द वापरलेत त्यामुळे जबलपूर घटीया होत नाही. मात्र एक गोष्ट नक्की सिद्ध होते की मेनका गांधी अतिशय घटीया महिला आहे. मला लाज वाटते की त्या माझ्या पक्षाच्या खासदार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. बिष्णोई यांच्या ट्विटमुळे या सगळ्या वादाला नव वळण मिळताना दिसत आहे.

Web Title :- Madhya Pradesh Political News | ‘Maneka Gandhi Ghatiya Mahila’, BJP MLA’s tweet created a stir

हे देखील वाचा

ICC T20 World Cup । आयपीएल- 2021 नंतर आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचीही तारीख जाहीर, ‘या’ ठिकाणी होऊ शकतात सामने

TATA Group | ‘टाटा’ ग्रुपच्या ‘ताज’नं केली जगातील मातब्बर कंपन्यांवर मात

Pune News | पुण्यात भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; घोषणाबाजीनं कात्रज परिसर दणाणला, माजी मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती