IAS अधिकारी निधी निवेदिता यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या भाजप नेत्याविरूध्द FIR

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बद्रीलाल यादव यांच्यावर मध्य प्रदेशातील राजगढ़चे जिल्हाधिकारी निधी निवेदिता यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस ब्यावरा येथे एसडीएम संदीप अष्ठाना यांच्या फिर्यादीवरून जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अभद्र भाषा वापरल्यामुळे कारवाई करण्यात आली. बुधवारी राजगढ जिल्ह्यातील ब्योरा येथे झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना भाजप नेते बद्रीलाल यादव यांनी राजगड जिल्हाधिकाऱ्यांवर आक्षेपार्ह विधान केले. या बैठकीत मध्यप्रदेश भाजपाचे कैलास विजयवर्गीय, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राकेश सिंह आणि विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांच्यासारखे मोठे नेते सहभागी झाले होते.

कैलास विजयवर्गीय आणि शिवराजसिंह चौहान येण्यापूर्वी त्यांनी भाषण करताना म्हंटले कि, ‘माझा मुद्दा चुकीचा समजू नका, परंतु माझ्या मनात एक गोष्ट आली, म्हणूनच मी बोलत आहे. जिल्हाधिकारी तिच्या मांडीवर कॉंग्रेसवाल्यांना दूध पाजतात आणि भाजपाला चापट मारतात. दरम्यान, बद्रीलाल यादव यांच्या विधानावर कॉंग्रेसने कडक आक्षेप घेतला होता आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्याचबरोबर आयएएस असोसिएशननेही मुख्य सचिवांना एक पत्र लिहून महिला अधिकाऱ्यांवर केलेल्या टीकेला अश्लील म्हंटले आहे.

भाजप नेत्यांनी ओलांडली सीमा :
केवळ बद्रीलालच नाही, तर भाजपचे बाकीचे नेते व्यासपीठावर भाषण देण्यासाठी गेले असता सीमा ओलांडताना दिसले. भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी असेही म्हटले होते की, ‘जर संविधान नसते तर तुम्ही घरी बसून रोटी बनवत असता. प्रत्यक्षात, सीएएच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर चापट मारल्यानंतर गोपाल भार्गव यांनी महिला जिल्हाधिकाऱ्याला संबोधित करताना सांगितले की, तुम्हला गर्दीत शिरण्याची काय गरज आहे? यासह, पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावून गोपाळ भार्गव यांनी महिला कलेक्टरला जास्त गर्मी असल्याचे देखील विचारले.

ज्येष्ठ नेत्यांचे शब्द बिघडले तेव्हा… :
निषेधाच्या वेळी केवळ मध्य प्रदेश भाजपचे नेतेच नव्हे, तर पक्षाचे राष्ट्रीय नेतेही त्यांच्या जीभेवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी व्यासपीठावरून महिला अधिकाऱ्यावर कडक शब्दांत निषेध केला आणि जिल्हाधिकारी जेएनयूतून शिक्षित असल्याचे सांगत ते म्हणाले की, तिथून व्हायरस आला आहे आणि हा व्हायरसचे लोकशाही पद्धतीने निर्मूलन करायला हवा.

‘कमलनाथ जी, मी चेतावणी देतो की तुम्ही जर या अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर भाजप कार्यकर्ता तुमच्या कलेक्टरवर थेट कारवाई करेल.’ अशी टीका कैलास विजयवर्गीय यांनी केली होती. या व्यतिरिक्त कैलास विजयवर्गीय यांनीही महिला जिल्हाधिकाऱ्यांवर वैयक्तिक भाष्य करत म्हटले होते की, ‘भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलबर यांचे नाव त्यांना माहित नसेल. हे खूप चांगले नाव आहे. कैलास विजयवर्गीय म्हणाले होते की, ‘मला प्रत्यक्ष कृतीवर विश्वास आहे. संगीताचे एक सूत्र आहे, जो जसा गातो तसे आपण वाजवायला पाहिजे. यात राजगढमधील लोक जरासे मागे पडले.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like