एक शेळी, दोन मालक आणि पोलिसांकडून महिला अटकेत

उज्जैन : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशमधील रतलाम जिल्ह्याच्या औद्योगिक पोलीस स्टेशनमध्ये शेळी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात एकाच शेळीवर दोघांनी मालकी सांगितली होती. हे प्रकरण सोडविण्या साठी दोन जिल्ह्यांच्या पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

उज्जैनच्या खाचरौद ठाण्याचे पोलीस देखील करत होते तपास

शेळीवर दोन व्यक्तींनी मालकी हक्क सांगितल्यामुळे पोलिसांसमोर चांगलाच पेचप्रसंग उभा राहिला. ज्या शेळीवर हे दोघेजण मालकी हक्क सांगत होते. ती साधारण शेळी नाही. या शेळीचा खाचरौद पोलीस स्टेशनचे पोलिसदेखील तपास करत होते. ही शेळी चोरीला गेल्याची तक्रार सोमवारी सकाळी खाचरौद पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. परंतु ही शेळी रतलाम जिल्ह्याच्या औद्योगिक पोलीस स्टेशनमध्ये सापडली. या शेळीवर दोन महिलांनी मालकी हक्क सांगत पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घातला.

हे पूर्ण प्रकरण उज्जैन जिल्ह्यातील खचारौद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भूवासा गावाशी संबंधित आहे. येथील रहिवासी असलेल्या रतनलाल यांची शेळी गेल्या रविवारी चोरीला गेलो होती. हे शेळी रतलाम बाजारात विकली जाण्याची शक्यता मालकाला होती. या बाजारात एक महिला ही शेळी विकायला आली होती. शेळीच्या मालकाने बाजारात जाऊन शेळीच्या चोराला पकडले. यानंतर शेळीचा मालक आणि चोर दोघेही पोलीस स्थानकात पोहचले आणि दोघांनीही शेळीवर मालकी हक्क सांगितला. आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

‘दुभंगलेल्या केसां’नी त्रस्त आहात ? मग ‘हे’ उपाय नक्कीच करा

‘मदरहूड हॉस्पिटल आणि स्फेरुल फाउंडेशन’ला ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’ प्रमाणपत्र

केवळ चवीसाठीच नाही तर, विविध आजारांसाठीही गुणकारी आहे ‘पुदिना’

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील