दोन सख्ख्या बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

पोलीसनामा ऑनलाइन – मध्यप्रदेशा ( Madhya Pradesh. ) तून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींनी एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बालाघाटमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मध्यप्रदेशा (Madhya Pradesh.) त  महिनाभरापूर्वी त्यांच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याच ताणतणाव आणि नैराश्यातून दोघीनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रीटा (वय 38) आणि संगिता कारसर्फे (वय 36) असे आत्महत्या केलेल्या बहिणींची नावे आहेत. त्यांच्या वडिलांचा तीन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. तर आईचे कोरोनाने महिनाभरापूर्वीच निधन झाले आहे. तेंव्हापासून दोघी चिंताग्रस्त आणि नैराश्यात होत्या, असे शेजा-यांनी सांगितले. त्यांचा लहान भाऊ काही कामानिमित्त शेजारच्या गावात गेला होता. तर मोठा भाऊ अनिल वरच्या मजल्यावर काम करत होता. या दोघी तळमजल्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. अनिल तळमजल्यावरून खाली आला त्यावेळी रिटा आणि संगिता दोघीही आत्महत्या केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघींचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयाकडे सोपवण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

READ ALSO THIS :

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

Corona Third Wave : नीती आयोगने म्हटले – ‘सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, तयार राहण्याची आवश्यकता’

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला