MP मध्ये 2 मालगाडयांची ‘धडक’, चौघांचा मृत्यू

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे कोळसा घेऊन जाणार्‍या दोन मालगाड्यांची समोरासमोर टक्कर झाली असून त्यात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या मालगाड्यांमध्ये अडकलेल्यांना इंजिन कापून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

कोळसा घेऊन जाणार्‍या या दोन मालगाड्या जात होत्या. त्यावेळी एका मालगाडीचे इंजिन घसरले व शेजारुन जाणार्‍या दुसर्‍या मालगाडीला जाऊन धडकले. त्यात इंजिनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या धडकेमुळे इंजिन एकमेकांमध्ये अडकले असून त्यात मालगाड्यांमधील चालक व त्यांचे सहकारी अडकून पडले आहेत. इंजिनाचे पत्रे कापून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अपघातस्थळी एनटीपीसीचे अधिकारी, पोलीस मोठ्या प्रमाणावर आले असून मदतकार्य सुरु आहे.