संतापजनक ! पहिला पतीच निघाला ‘नराधम’, साथीदारांसह केला सामूहिक बलात्कार, गुप्तांगावर दिले सिगारेटचे ‘चटके’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका विवाहित महिलेवर तिच्या पहिल्या पतीने त्याच्या साथीदारासह सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्यावरच हे नराधम थांबले नाहीत. त्यांनी या महिलेच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके दिले, शिवाय विषय देऊन तिला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. सदर पीडित महिला ही रस्त्यावर सापडली आहे. सध्या तिच्यावर उपचारही सुरु आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मध्य प्रदेशातील रतलाममधील ही घटना आहे.

सदर महिलेला तिच्या पतीने महिन्याभरापूर्वी ट्रीपल तलाक दिला होता. यानंतर तिने दुसरं लग्न केलं. यानंतर पहिल्या पतीने महिलेच्या दुसऱ्या पतीला मारहाण केली. हे प्रकरण पोलिसांत जाऊ नये यासाठी तो तिला धमक्या आणि इतर त्रास देऊ लागला. परंतु आपण पोलिसात जाणार यावर ती ठाम होती. यानंतर तिला धडा शिकवण्यासाठी आरोपी संधी शोधत होता. पीडित महिलेने याबाबत माहिती दिली.

महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 7 ऑक्टोबर रोजी ती कपडे शिवण्यासाठी जात होती. पहिल्या नवऱ्यानं बहिण आणि भाच्यांच्या मदतीने तिचे अपहरण केले. यानंतर पीडितेला शेतात नेले. आरोपीने साथीदारांसह दारू पार्टी केली. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिने पोलिसात जाऊ नये  यासाठी तिचा छळ करण्यात आला. परंतु ती मात्र आपल्या निर्णयावर ठाम होती. यानंतर तिच्या पहिल्या नवऱ्याने तिला सिगारेटचे चटकेही दिले. तिला किटकनाशक पाजून तिला रस्त्यावर फेकण्यात आलं. यानंतर आरोपी फरार झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. यानंतर पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Visit : Policenama.com