पोटनिवडणुक नव्हे भारत – PAK मधील निवडणुक, नेत्यांनी तोडले तारे

झाबुआ (मध्य प्रदेश) : वृत्तसंस्था – महाराष्ट्र, हरियाना राज्यातील विधानसभा बरोबर देशभरातील रिकाम्या असलेल्या जागांसाठी पोटनिवडणुक घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत भारत पाकिस्तानचा भाजपाने टाकलेला गिअर अजून तोच कायम असल्याचे दिसून येत आहे. एका राज्यातील विधानसभेची पोटनिवडणुक ती काय पण भाजपाच्या नेत्याने तिला देशाच्या इज्जतीशी जोडली आहे. ही निवडणुक भारत पाकिस्तान यांच्यामधील असल्याचे तारे तोडले आहेत.

मध्य प्रदेशचे भाजपाचे नेते प्रतिपक्ष गोपाल भार्गव हे झाबुआ मतदारसंघात प्रचारासाठी आले होते. तेथे भाजपाचे भानू भूरिया निवडणुक लढवत आहे. यावेळी भूरिया यांचा उमेदवारी अर्ज भरताना काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये भार्गव यांनी सांगितले की, या निवडणुकीत देशाच्या इज्जतीचा सवाल आहे. भूरिया हे भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे तर, माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे उमेदवार कांतिलाल भूरिया हे पाकिस्तानचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. दोन पक्षातील निवडणुक नसून भारत पाकिस्तानमधील निवडणुक आहे.

Visit : policenama.com