61 वर्षीय ‘पॉप सिंगर’ मॅडोनानं केलं 25 वर्षीय बॉयफ्रेंडला KISS (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अमेरिकन पॉप सिंगर मॅडोनानं 50 वं सिंगल साँग नंबर वन झाल्याच्या आनंदात एका ग्रँड पार्टी ऑर्गनाईज केली. सध्या या पार्टीचे काही फोटो समोर आले आहेत जे प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. मॅडोनानं स्वत: इंस्टाग्रामवरून हे फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये मॅडोना म्हणते, “थँक यू लंडन”

फोटोत दिसत आहे की, 61 वर्षांची मॅडोना आपल्या 25 वर्षांच्या बॉयफ्रेंडला किस करत आहे. मॅडोनाचे हे किसींग फोटो समोर आल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.

मॅडोनानं या ग्रँड पार्टीत वेगवेगळ्या अंदाजात केक कापला. याशिवाय तिनं पाहुण्यांसोबत खूप मजा-मस्तीही केली आहे. सध्या या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

मॅडोनाबद्दल बोलायचं झालं तर ती 25 वर्षीय ॲहलामलिक विल्यम्स (Ahlamalik Williams)ला गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत आहे. आपल्या या रिलेशनशिपमुळे ती अनेकदा चर्चेचा हिस्सा बनताना दिसत आहे.

इंस्टाग्रामवरून काही फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये मॅडोना म्हणते, “लंडन तू कमाल आहेस. माझ्या प्रिय तुम्हा सर्वांशिवाय हे काम कधी होऊच शकलं नसतं.”

मॅडोनाचा जन्म 16 ऑगस्ट 1958 रोजी झाला आहे. मॅडोना रे ऑफ लाईट, मॅडम एक्स, ट्रु ब्लू, म्युझिक आणि इरोटिका यांसारख्या अल्बमसाठी खूपच प्रसिद्ध आहे.

 

 

You might also like