Madras High Court | वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा ! कार खरेदीवर पाच वर्षाची विमा सक्ती नाही – उच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Madras High Court | नवीन कार खरेदी करताना ५ वर्षांचा विमा बंधनकारक केल्याने वाहनांच्या किमतीत ५० हजार ते दोन लाखापर्यंत वाढ झाली होती. आपल्या आदेशाच्या अंमलबजावणीवर न्यायालयाने सूचना मागविल्या होत्या. वाहन कंपन्या, वाहन नियामक इरडासह (insurance regulatory and development authority of india – IRDA) अनेक संस्थांनी या निर्णयाला विरोध केला होता. मात्र उच्च न्यायालयाने (Madras High Court) निवाड्यात दुरुस्ती केली असून नवीन कार खरेदी करताना आता पाच वर्षाचा विमा बंधनकारक नसल्याचा नवा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे कार खरेदीदारांसह वाहन उत्पादक कंपन्या आणि वितरकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) ४ ऑगस्ट रोजी एका निवाड्यात कार खरेदी करतेवेळीच सलग ५ वर्षांचा विमा घेणे बंधनकारक करण्याची अट घातली होती. वाहन कंपन्या, वाहन नियामक इरडासह अनेक संस्थांनी विरोध दर्शवल्यानंतर या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सूचना मागवल्या होत्या. सामान्य विमा कंपन्या, वाहन उत्पादक कंपन्या आणि विमा एजंटांच्या संघटना यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आदेशात सुधारणा केली. दरम्यान, प्रवाशांची सुरक्षा हाच आपला केवळ उद्देश आहे. केवळ सल्ला म्हणून आता जुन्या निवाड्यातील आदेश आता व निवाड्यात त्यानुसार बदल केले जातील, तसेच यासंबंधी कायदा बनविण्याचा निर्णय संसदेवर सोपविला जाईल, असे न्यायालयाने नमूद केले.

 

Web Title : Madras High Court | madras hc directs there no compulsion take five years insurance car purchase

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Greenfield Expressway | आता दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 13 तासात, वर्षाला 32 कोटी लिटर इंधन वाचणार

Jobs | नोकरी शोधणार्‍या तरूणांसाठी खुशखबर ! तिसर्‍या तिमाहीत 44 % नवीन नियुक्त्या करतील कंपन्या, जाणून घ्या

Gopichand Padalkar | ‘काका-पुतण्याच्या’ टोळीनं ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ बळकावलेली 113 एकर जमीन मोकळी केली’ – गोपीचंद पडळकर (व्हिडिओ)