Madras High Court | बलात्कार पीडितेवर करण्यात येणार्‍या ‘टू-फिंगर टेस्ट’वर मद्रास हाईकोर्टाने घातली बंदी, म्हटले – ‘तत्काळ प्रतिबंध करावा’

नवी दिल्ली : बलात्कार पीडितेवर (Rape Victims) करण्यात येणार्‍या टू फिंगर टेस्टवर (Two Finger Test) तात्काळ बंदी घालण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) राज्याला दिले आहेत. मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) बलात्कार पीडितेवर डॉक्टरांकडून करण्यात येणार्‍या टू फिंगर टेस्टवर तात्काळ बंदी घालण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. हा आदेश न्यायमूर्ती आर. सुब्रमण्यम (Justice R. Subramaniam) आणि न्यायमूर्ती एन सतीश कुमार (Justice N Satish Kumar) यांच्या खंडपीठाने जारी केला आहे (Ban On Two Finger Test).

 

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ही चाचणी अजूनही लैंगिक गुन्ह्यांच्या (Sexual Offenses) प्रकरणांमध्ये वापरली जात आहे. विशेषतः अल्पवयीनविरुद्ध. मद्रास उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) हवाला देत म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले होते की, ही चाचणी गोपनीयतेच्या अधिकाराचे, शारीरिक आणि मानसिक अखंडतेचे आणि बलात्कार (Crime Against Woman) पीडितेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन करते. (Madras High Court)

 

काय आहे प्रकरण

एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेल्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.
या व्यक्तीने जन्मठेपेची शिक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. हे प्रकरण 16 वर्षांच्या मुलीच्या कथित लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहे.
मुलीची टू फिंगर टेस्ट केल्यानंतर महिला कोर्टाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्याला POCSO कायद्यान्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

खंडपीठाचा आदेश

खंडपीठाने सांगितले की, वरील न्यायालयीन निर्णय पाहता, टू-फिंगर टेस्ट सुरू ठेवता येणार नाही,
याबाबत आम्हाला शंका नाही. त्यामुळे आम्ही राज्य सरकारला निर्देश देत आहोत की,
लैंगिक गुन्ह्यांना बळी पडलेल्यांवर वैद्यकीय व्यावसायिकांकडून करण्यात येणार्‍या टू-फिंगर टेस्टच्या प्रथेवर तात्काळ बंदी घालण्यात यावी.

 

Web Title :- Madras High Court | madras high court banned two finger test apply on rape victim court instructed to state

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा