Madras High Court | महिला स्वेच्छेने वेगळी झाल्यास नंतर पोटगीसाठी दावा करू शकत नाही, उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

चेन्नई : Madras High Court | जर पत्नीने स्वेच्छेने वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि घटस्फोटाच्या वेळी तिने पोटगीची मागणी केली नाही, तर ती नंतर पोटगीसाठी दावा करू शकत नाही. असे मद्रास उच्च न्यायालयाने एका कौटुंबिक वादाच्या प्रकरणात महत्वपूर्ण निर्णय देताना म्हटले आहे. (Madras High Court)

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश भरत चक्रवर्ती यांनी महिलेची पुनर्विचार याचिका फेटाळून लावत तिला पोटगी मागण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरोधात महिलेने उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती.

मासिक 1 लाख रूपये पोटगी मिळावी अशी मागणी महिलेने केली होती. यासोबतच तिने आपल्या 35 वर्षीय आजारी मुलाच्या उपचारासाठी 5.80 कोटी रुपयांची मागणी केली होती. कौटुंबिक न्यायालयाने तिची ही पोटगीची याचिका फेटाळल्याने तिने उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून पोटगी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. (Madras High Court)

महिलेच्या पतीलने या प्रकरणातील दुसरी याचिका दाखल केली होती.
कौटुंबिक न्यायालयाने मुलाच्या उपचारासाठी पतीने दरमहा 80 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाला पतीने आव्हान दिले होते.
पतीनुसार रक्कम 80 हजारहून दरमहा 20 हजार करावी असे म्हटले होते.
मुलगा रिफ्रेक्टरी सीझर डिसऑर्डरने ग्रस्त आहे.

Web Title :-  Madras High Court | woman who separates from her husband on her own will then she will not get maintenance said madras high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! तरुणीच्या प्रायव्हेट भागावर दारू ओतून खायला घातली मिरची पूड, केले ब्लेडने सपासप वार; भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे निगडी परिसरात खळबळ

Shrikant Eknath Shinde | खासदार श्रीकांत शिंदेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून कारभार?, राष्ट्रवादीकडून ‘तो’ फोटो ट्विट करत केले गंभीर आरोप