दलित विद्यार्थ्यावर शाळेत हल्ला, पाठीपासुन कमरेपर्यंत केले ब्लेडने सपासप वार

मदुराई (तामिळनाडू) : वृत्तसंस्था – तामिळनाडू येथील मदुराईमध्ये एका दलित शाळकरी मुलावर त्याच्याच वर्गातील एका मुलाने ब्लेडने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीवर आणि कंबरेवर वार करण्यात आले आहेत. जखमी विद्यार्थ्याची स्कूल बॅग लपवून ठेवण्यात आली होती. ती शोधत असताना त्याच्यावर जातीविषयक वक्तव्य करून वार करण्यात आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी दलित विद्यार्थी इयत्ता 9 वीच्या वर्गात शिकतो. शुक्रवारी सायंकाळी त्याची स्कूल बॅग लपवून ठेवली. बॅगेचा शोध घेत असताना त्याची बॅग त्याच्याच वर्गातील महेश्वरन याने लपवून ठेवल्याचे समजले. त्याने महेश्वरन याच्याकडे आपल्या बॅगेची मागणी केली त्यावेळी महेश्वरन याने शिवीगाळ करत त्याच्या जातीवरून वक्तव्य केले. यावरून दोघांमध्ये वाद होऊन त्याचे रुपांतर भांडणात झाले. संतापलेल्या महेश्वरन याने ब्लेडने त्याच्यावर हल्ला केला.

घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान या घटनेची दखल शाळा प्रशासनाने घेत चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्याकडे चौकशी केली असता त्याने आपण फक्त माझी बॅग मागितली होती. त्याने मला जातिवाचक शिवीगाळ करून ब्लेडने वार केल्याचे सांगितले. या प्रकारामुळे जखमी मुलाचे पालक भयभीत झाले असून शाळा प्रशासनाने त्यांना आरोपी मुलावर कारवाई करण्याचे आश्वासन देत तुमच्या मुलाची काळजी घेऊ, असे आश्वासन दिले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी