मॅगीला झटका ! कंपनीने कबुल केले उत्पादनात होते शिसे 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झटपट तयार होणाऱ्या पदार्थामध्ये मॅगी नूडल्स चा प्रथम क्रमांक लागतो. पण काही दिवसांपूर्वी  मॅगी नूडल्समध्ये शिसे आढळल्याने एकाच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची न्यायालयात केस चालू असताना सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी जोरदार झटका बसला. आमचे उत्पादन चांगलेच आहे असे वारंवार सांगणाऱ्या कंपनीने सर्वोच्च न्यायालयात मान्य केले की, त्यांचे लोकप्रिय असलेले एपएमसीजी उत्पादन मॅगी नूडल्समध्ये (Maggi Noodles ) अतिरिक्त प्रमाणात शिसे (lead ) होते. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना मॅगीच्या वकीलांनी या आरोपाचा स्वीकार केला.
 या बातम्या आल्या तेव्हा प्रत्येक वेळी मॅगीचे उत्पादन करणारी उत्पादक असलेल्या नेस्ले कंपनीने या वृत्ताचे खंडण केले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या एका सुनावणीत आपल्यावरील आरोप नेस्ले कंपनीने मान्य केले आहेत.
मॅगी विरोधी मोहीम तीव्र होणार 
कंपनीच्या वकिलानेच न्यायालयात आरोपाचा स्वीकार केल्यामुळे यापुढे सरकारकडून सुरु असलेली मॅगी विरोधी मोहीम अधिकच तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मॅगीमध्ये अतिरिक्त प्रामाणत शिसं असल्याचे कंपनीने मान्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने NCDRC ला पुढील कारवाई करण्यास मान्यता दिली. ही कारवाई करण्यावर या आधी स्थगिती देण्यात आली होती.
६४० कोटींची नुकसान भरपाईची मागणी 
दरम्यान, मॅगीमध्ये शिशाची मात्रा असल्याचा आरोप एनसीडीआरसीने (NCDRC) केला होता. या आरोपावरुन दाखल झालेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली. महत्त्वाचे म्हणजे, अन्न सुरक्षा मंत्रालयाने घालून दिलेल्या अटींची पूर्तता न करण्यात आल्याने गेल्याच वर्षी कंपनीला शेकडो टन मॅगी नष्ट करावी लागली होती. यानंतर सरकारने नुकसारभरपई म्हणून ६४० कोटी रुपयांची मागणीही कंपनीकडे केली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या नायाधीशांनी नेस्लेच्या वकिलांना विचारले की, लेडची मात्रा असलेली मॅगी लोकांनी का खावी? सुरुवातीला वकिलांनी म्हटले होते की, मॅगीमद्ये लेडची मात्रा ठरवून दिलेल्या कक्षेतच आहे. पण, आता मॅगीत लेडची मात्रा असल्याचे वकिलांनी मान्य केले.