मिठाच्या गुहेनं जादू केली… अन ७५ वर्षाच्या आजींना जगण्याची उमेद मिळाली 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (प्रेरणा परब-खोत) – “माझ्या दम्याच्या त्रासामुळे घरचे सगळे वैतागले होते. सतत खोकला त्यामुळं माझी आणि घरातल्या इतरांची देखील झोप होत नव्हती. पण या मिठाच्या गुहेत आले आणि जणू जादूच झाली. आज माझं वय ७५ वर्षे, मी या मिठाच्या गुहेत येताना मला धड चालताही येत नव्हतं पण आज फक्त आडीच महिन्याच्या ट्रीटमेंट नंतर मात्र मला जगण्याचा आनंद मिळतोय. वयाच्या या टप्प्यावर पुन्हा आनंदानं जगावं वाटतंय. कुठलं औषध नाही, कुठल्या वेदना नाहीत फक्त या मिठाच्यागुहेत आल्यामुळं आयुष्य म्हणजे फक्त आनंद झालाय”. मूळच्या मुंबईच्या असणाऱ्या माधुरी यल्लत्तीकर नावाच्या आजींची ही गोष्ट तुम्हाला देखील जगण्याची नवीन आशा देऊन जाईल.

नक्की काय आहे मिठाची गुहा (सॉल्ट थेरपी)
खरंतर मिठामुळे जेवणाला चव येते, मीठ नसलेले जेवण आळणी आणि बेचव होते. पण तुम्हाला माहीत आहे का एक उपचार पद्धती म्हणून देखील मिठाचा रोल तितकाच महत्वाचा आहे. वर्षांनुवर्षे औषधे गोळ्या घेऊन कमी न होणाऱ्या आजारावर वेदनाविरहित अशी ही आधुनिक सॉल्ट थेरपी खूप प्रभावी ठरते. कृत्रिम मिठापासून ही गुहा तयार केलेली असते. या गुहेत भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडला जातो. तापमान, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट आणि ह्युमिडिटी तसेच ब्रॉंकायझच्या गरजेनुसार सॉल्ट पार्टिकल गुहेतील हवेत सोडले जातात. मशीनद्वारे हे सर्व मॉनिटर केले जाते. अशा वातावरणात (Dry Aerosol Of NaCl ) म्हणजेच वाळलेले मीठ निगेटिव्हली आयोनायझ करून रुग्णापर्यंत पोहचवले जातात.

श्वसनाद्वारे हे आजार बरे केले जातात. या गुहेत असे वातावरण तयार केलेले असते ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसनांमध्ये अधिक प्रमाणात ऑक्सिजन घेतला जातो. तसेच तेथील अल्कलाईन वातावरणात जास्तीत जास्त प्रमाणात तेथील ऑक्सिजनयुक्त हवा आत घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील पांढऱ्या पेशी अधिक चांगल्या प्रकारे कार्यान्वित होतात आणि रोगावर हल्ला करतात. जसजसा या ट्रीटमेंटचा पुढचा टप्पा येतो तसा तुमचा रोग अधिक कमकुवत होत जातो. कालांतराने नाहीसा होतो. या मिठाच्या गुहेत फक्त तुम्ही बसायचे असते. ही ट्रीटमेंट विशेषतः फुफ्फुसांच्या, श्वसनाच्या, त्वचेच्या रोगांवर प्रभावी ठरते. जुनाट सर्दी, खोकला, दमा श्वसनातील संसर्ग, ऍलर्जीं ची सर्दी खोकला, अशा रोगांवर सॉल्ट ट्रीटमेंट फायदेशीर आहे. ही मिठाची गुहा पुण्यातील कोरेगाव पार्क तेथे आहे ‘सॉल्ट केव्ह एशिया’ असे या मिठाच्या गुहेचे नाव आहे.

धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींकरिता वरदान ठरतेय सॉल्ट थेरपी
धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींकरिता ही थेरपी खूप महत्वाची ठरते आहे. जर समजा एखादा व्यक्ती रोज १० सिगारेट घेत असेल आणि आठवड्याला ७० सिगारेट घेत असेल तर सॉल्ट थेरपीच्या केवळ २ सेशन नंतर याचे संपूर्ण डेटॉक्सिन होते. त्यामुळे अशा व्यक्तींकरिता ही थेरपी अत्यंत प्रभावी आहे. एवढेच काय फुफ्फुसाच्या कर्करोगावर देखील ही उपचारपद्धती प्रभावी आहे असे सॉल्ट केव्ह एशिया चे डॉ. प्रदीप वाघमारे यांनी सांगितले.

ही उपचार पद्धती त्वचा रोगांवर देखील अतिशय प्रभावी आहे. सामान्यता कोणत्याही त्वचारोगावर उपचार करताना भरमसाठ क्रीम आणि औषधे गोळ्यांचा भडीमार केला जातो. मात्र सोरायसिस सारखा त्वचारोग देखील बरा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत असे डॉ.  वाघमारे सांगतात.

निरोगी आरोग्यासाठी मिठाच्या गुहेत काही वेळ घालवाच
सध्या हेवेचे प्रदूषण ही खूप मोठी समस्या बनली आहे. पुण्याचा विचार करता पुणे शहर सर्वाधिक ध्वनी प्रदूषण असणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहरातील हवा इतकी प्रदूषित आहे की जाणून धूम्रपानाचा धुरच फुफ्फुसांमध्ये घेतला जातो. त्यामुळे तुमच्या उत्तम आरोग्याकरिता आयुष्यातला काही वेळ या मिठाच्या गुहेत घालवायला काहीच हरकत नाही. कोणताही रोग नसलेला सामान्य व्यक्ती देखील ही सॉल्ट थेरपी घेऊ शकतो. सॉल्ट थेरपीच्या एका सेशनमध्ये जवळपास ३० दिवस केलेला प्राणायामाएवढा परिणाम होतो.

आता ही मिठाची गुहा म्हणजेच सॉल्ट थेरपी कोरेगाव पार्क इथल्या ‘सॉल्ट केव्ह एशिया’ मध्ये दिली जाते. तुम्हाला देखेल तुमचे आजार पळवायाचे असतील आणि आनंदी राहायचे असेल तर या सॉल्ट थेरपीकरिता संपर्क क्रमांक आहे – 702 888 6000