Magical Eye Drop | खुशखबर ! वैज्ञानिकांनी बनवला डोळ्यांसाठी चमत्कारी ड्रॉप, दूर होईल चष्मा !

नवी दिल्ली : वृत्त संस्था  Magical Eye Drop | ज्यांची दृष्टी कमकुवत आहे, परंतु प्रत्येक वेळी वाचताना चष्मा लावणे आवडत नाही, त्यांच्यासाठी वैद्यकीय विज्ञानाने चमत्कारिक आय ड्रॉप तयार केला आहे (magical eye drop could replace reading glasses). हा आय ड्रॉप डोळ्यांमध्ये घातल्यानंतर दृष्टी तीक्ष्ण होईल आणि चष्मा लावण्याची गरज भासणार नाही. (Magical Eye Drop)

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या ड्रॉपचाही खूप फायदा झाला आहे. वुईटी Eye Drop नावाच्या या आयड्रॉपची प्राथमिक चाचणी 750 रूग्णांवर करण्यात आली आहे, ज्याचे परिणाम अतिशय प्रभावी आहेत. अमेरिकेतील औषध नियामक FDA ने देखील सर्वसामान्यांसाठी त्याच्या वापराला मंजूरी दिली आहे.

चमत्कारिक आहे वुईटी Eye Drop

आयर्लंडच्या एलर्जन या फार्मा कंपनीने हा आय ड्रॉप तयार केला आहे. याच्या चाचणीत प्रमुख भूमिकेत असलेले नेत्रतज्ज्ञ डॉ. जॉर्ज ओ. वारिंग यांनी सांगितले की, वाढत्या वयाबरोबर लोकांना प्रिस्बायोपियाचा त्रास सुरू होतो, ज्यामुळे दृष्टी कमकुवत होऊ लागते.

अशावेळी Vuitty आय ड्रॉप प्रभावी ठरतो. हा आय ड्रॉप 15 मिनिटांत त्याचा प्रभाव दाखवतो आणि त्याचा प्रभाव टाकल्यानंतर अनेक तास टिकतो.
Vuety Eye Drop चा एक थेंब डोळ्यात टाकल्यानंतर 6 ते 10 तास दृष्टी पूर्वीच्या तुलनेत चांगली होती. (Magical Eye Drop)

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्टीफन ऑर्लिन यांनी सांगितले की,
या आय ड्रॉपमुळे बुबळाचा आकार लहान होतो यामुहे जवळची गोष्ट स्पष्टपणे दिसू लागते.

 

ड्रॉपची किंमत 6000 रुपये

कंपनीच्या म्हणण्यानुसार, या औषधाच्या एका महिन्याच्या डोसची किंमत सुमारे 6 हजार रुपये असेल.
रॉचेस्टर विद्यापीठातील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्कॉट एम. मॅकरेनी यांच्या मते,
ज्यांना चष्मा सहन होत नाही त्यांच्यासाठी हा ड्रॉप एक चांगला पर्याय आहे.
चाचणीचे निकाल सांगतात की, हा नवीन आय ड्रॉप अशा रुग्णांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. Vuitty Eye Drop हे पहिले असे औषध आहे जे प्रेस्बायोपियाच्या उपचारांमध्ये वापरले जाते.

Web Title : Magical Eye Drop | new fda approved magical eye drop could replace reading glasses

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती; कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार; इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख, जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी